ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

तेलुगूत रिलीज होणार सिध्दार्थ जाधवचा मराठी चित्रपट

मुंबई, दि. १६ - भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपल्या गणतंत्रात विलीन होण्यास हैदराबाद राज्याने साफ नकार दिला. कारण होते तेथील रझाकार जमात; त्यावेळी जिचे बोधवाक्य होते हैदराबाद हिंदुस्तानात विलीन नाही होणार. हिंदुस्थान हैदराबादमध्ये सामायिक होणार. ही रझाकार जमात क्रूरतेने अत्याचार करून स्थानिकांना दहशतीमध्ये ठेवण्यात यशस्वी झालेली होती. त्यांच्याविरुद्ध आवाज उठवणारे कोणी नव्हते. लेखक-दिग्दर्शक राज दुर्गे यांनी दोनेक वर्षांपूर्वी याच इतिहासावररझाकारचित्रपट बनवला.

सिध्दार्थ जाधवने या चित्रपटात रझाकारच्या विरोधात ठामपणे उभा राहणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. हैदराबादच्या इतिहासाची पार्श्वभूमी या चित्रपटाला असल्याकारणाने निर्माते हा चित्रपट तेलुगू भाषेत डब करून आंध्र प्रदेशात प्रदर्शित करणार आहेत जेणेकरून तेथील नव्या पिढीला त्यांच्या राज्याच्या इतिहासाची ओळख होईल.

रेणू देसाई यांनी तेलुगू भाषेत अभिनेत्री म्हणून अनेक चित्रपट केले आहेत. आदिनाथ कोठारे-सुलग्न पाणीग्रही जोडीचाइष्कवाला लव्हया मराठी चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शन रेणू देसाई यांनी केले होते. त्यांचा स्वतःचा फॅन-बेस तेलुगू फिल्म्स बघणारा असल्याकारणाने त्यांनी हाच चित्रपट तेलुगूत डब करून प्रदर्शित केला होता. तसेच नुकताच सचिन तेंडुलकरच्या जीवनावरीलसचिन बिलियन ड्रीम्सहा देखील हिंदी-इंग्लिश-मराठी बरोबर तामिळ आणि तेलुगू भाषेत डब करून प्रदर्शित केला होता प्रतिसादही चांगला मिळाला. खरंतर यामुळे मराठी चित्रपट निर्मात्यांच्या आशा पल्लवित झाल्या असणार, कारण आपले मराठी चित्रपट दाक्षिणात्य वा इतर भाषेत डब करून प्रदर्शित करता आले तर मराठी चित्रपटांना एक नवीन मार्केट उपलब्ध होईल.