ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

श्रद्धाच्या ‘हसीना पारकर’चा टीझर रिलीज

मुंबई, दि. १७ - गेले बरेच दिवस चर्चा असलेल्या बॉलिवुड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्याहसीना: क्वीन ऑफ मुंबईचा टिजर आऊट झाला आहे. या चित्रपटाचे पोस्टरही काही दिवसांपूर्वीच लॉंच करण्यात आले होते. अपूर्वा लखियाच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात श्रद्धा कपूर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीन हसीना पारकरच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. मुंबईतील गुन्हेगारी वर्तुळातील हसीना पारकर हे चर्चीत नाव होते. त्यामुळे या चित्रपटाची चर्चा आहे.

हसीना पारकरचा जुलै २०१४ मध्ये मृत्यू झाला. हसीनावर एकुण ८८ खटले दाखल होते. मात्र, आयुष्यात केवळ एकच वेळ ती न्यायालयापूढे हजर झाली होती. प्रसारमाध्यमांतून आलेल्या बातम्यांचा हवाला घ्यायचा तर, हसीना आपला भाऊ दाऊदची मुंबईतील सुमारे १००० कोटी रूपयांचे साम्राज्य सांभाळत असे. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडते आहे की, वास्तवातील भाऊ बहीण चित्रपटातही भाऊ बहिणीचा रोल साकारत आहेत. या चित्रपटात श्रद्धा कपूर वेगवेगळ्या चार लुक्समध्ये झळकणार आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर टीनएजर ते एका मुलाची आई अशी बदलती भूमिका साकारणार आहे.