ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

प्रेक्षकांची सुनिल ग्रोवरने केली घोर निराशा

मुंबई, दि. १९ - नुकताच सोनी वाहिनीवरसुपरनाइट विथ ट्युबलाइटहा दोन तासांचा विशेष कार्यक्रम प्रसारित झाला. सलमान खान आणि सोहेल खानने आगामी चित्रपटट्युबलाइटच्या प्रमोशनसाठी झालेल्या या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचे कपिल शर्मा शोमध्ये एक काळ गाजवणारे सुनील ग्रोवर, चंदन प्रभाकर, सुगंधा मिश्रा, अली असगर आणि संकेत भोसले यांनी भरभरून मनोरंजन केले. पण या कार्यक्रमातून सुनील ग्रोवरकडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षांची पूर्तता सुनीलकडून तेवढ्या प्रमाणात झाली नसल्याची सध्या चर्चा होत आहे. तर संकेत भोसले या कार्यक्रमातून प्रेक्षकांची मने जिंकणारा विनोदवीर ठरला.

सुनील ग्रोवर डॉक्टर मशहूर गुलाटीच्या भूमिकेत आणि अली असगर नर्स लैलाच्या भूमिकेत कार्यक्रमाच्या पहिल्या भागात प्रेक्षकांसमोर आले. पण त्यांच्या विनोदाने यावेळी तेवढी कमाल केली नाही. त्यानंतर अभिनेत्री मौनी रॉयनेसुपर डान्सर्सची विजेती दित्या आणि स्पर्धक मासूम आणि योगेशसोबत सलमानच्या गाण्यांवर नृत्य सादर केले. त्यानंतर पुन्हा जेव्हा सुनील अमिताभ बच्चनच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आला, तेव्हाही त्याच्या विनोदांमध्ये नाविन्य नव्हते. त्यामुळे त्याच्या दोन्ही भूमिकांनी प्रेक्षकांची निराशा केली.