ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

महिला पत्रकाराचा गैरसमज ‘ट्यूबलाईट’च्या माटिनने केला दूर

मुंबई, दि. २१ - अवघे दिवस सलमान खानचा आगामीट्युबलाइटचित्रपट प्रदर्शित होण्यास शिल्लक असून सलमान विविध कार्यक्रमांमधून, सोशल मीडियावरून चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. सोमवारी प्रमोशनसाठी झालेल्या अशाच एका कार्यक्रमातट्युबलाइटमधील बालकलाकार माटिन रे तंगूसुद्धा उपस्थित होता. अरूणाचल प्रदेशमधील इटानगर येथील अवघ्या आठ वर्षांचा माटिन याआधी चित्रपटाच्या ट्रेलरमध्येच झळकला होता. पण सलमान आणि माटिनच्या जोडीने या कार्यक्रमात सर्वांचीच मने जिंकली. माटिन या कार्यक्रमात निरागसता आणि हजरजबाबीपणामुळे सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

माटिनने एका महिला पत्रकाराला या कार्यक्रमात दिलेल्या उत्तराने सर्वांचेच लक्ष वेधलेय. या महिला पत्रकाराने माटिनला चिनी नागरिक समजत पहिल्यांदा भारतात येऊन तुला कसे वाटते आहे, असा विचित्र प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारताच तिच्या बाजूला बसलेल्या एका महिलेने माटिन चिनी नसून अरुणाचल प्रदेशचा असल्याचे तिला सांगितले. आपली चूक लक्षात येताच महिला पत्रकाराने तोच प्रश्न फिरवून माटिनला पहिल्यांदा मुंबईत येऊन कसे वाटते आहे, असा दुसरा प्रश्न विचारला. माटिनला तिचा प्रश्न नीट ऐकू आल्याने पुन्हा एकदा प्रश्न विचारण्यास सांगितले. त्यावेळी पहिला प्रश्न ऐकलेल्या सलमानने माटिनला सांगितले की, तू पहिल्यांदा भारतात आला आहेस का असे ती विचारत आहे. त्यावर हजरजबाबी माटिनने उत्तर दिले की, ‘हम इंडिया पर ही बैठता है, तो इंडिया मे तो आयेगा ही कैसै? जेव्हा माटिनट्युबलाइटचित्रपटाच्या निमित्ताने सर्वांसमोर आला, तेव्हा तो चिनी असल्याचेच अनेकांना वाटले. मात्र आपल्या या उत्तराने माटिनने हा गैरसमज दूर केला.