ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

चंदू चायवाल्याची कपिलच्या शोमध्ये वापसी

मुंबई, दि. २३ - गेल्या काही आठवड्यापासून कपिल शर्मा शोवादामध्येच अडकला आहे. पण आताटाइम्स ऑफ इंडियाया वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, शोमध्ये चंदू चायवाल्याची व्यक्तिरेखा साकारणारा चंदन प्रभाकर या शोमध्ये परतणार असून सुनीलसह, चंदन प्रभाकर आणि अली असगर या तिघांनीही सुनील आणि कपिलमध्ये झालेल्या वादानंतर एकाचवेळी हा शो सोडला होता. पण आता चंदन या शोमध्ये परत येणार असल्याचे निश्चित झाले आहे.

असा काही वाद सुनील आणि कपिलमध्ये झाला होता की त्यामुळे हे तिघेही कपिलसोबत पुन्हा कधी एकत्र काम करतील असेच चित्र निर्माण झाले होते. पण चंदनने अचानक आपले मत बदलले असे म्हणावे लागेल. सर्वांनाच त्याच्या या बदललेल्या मताचे आश्चर्य वाटले. कपिलच्या शोशी निगडीत एका सुत्राने सांगितले की, या शोमध्ये चंदन जर परत येत आहे तर ही चांगलीच गोष्ट आहे. कपिल आणि चंदनने झाले गेले विसरून जाण्याचा निर्णय घेतला आहे.

चंदन शोमध्ये परतण्याबद्दल बोलताना म्हणाला की, हे खरे आहे की मी कपिल शर्मा शोमध्ये परत येत आहे. या शोच्या चित्रीकरणालाही मी सुरूवात केली आहे. कदाचित येत्या रविवारी माझा एपिसोड प्रदर्शितही होईल. यापुढे मी प्रत्येक भागाच्या चित्रीकरणावेळी असणार आहे.