ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मुंबईत एका क्लिकवर रक्तदाता तसेच इतर सुविधा मिळणार

मुंबई, दि. १८ (प्रतिनिधी) - मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना गरजेनुसार एका क्लिकवर पाच हजार रक्तदात्यांची यादी उपलब्ध होणार आहे. कुर्ला येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकीमधून ही व्यवस्था केली आहे.

‘एम-हेल्थ’ नावेचे अ‍ॅप त्यासाठी या तरुणांनी तयार केले आहे. गरजू रुग्णांना बरेच वेळा फ्रेश रक्त लागते. याचाच अर्थ थेट रक्तदात्याने रक्तदान करणे यासाठी आवश्यक असते. ही गरज लक्षात घेऊन कुर्ला येथील आरएसएसच्या तरुणांनी गेले वर्षभर कुर्ला परिसरात ३५ ठिकाणी विविध मंडळांच्या सहकार्याने पाच हजार रक्तदात्यांची यादी बनविण्याचे काम केले. 

किरण दामले, डॉ. ज्ञानेश गवाणकर, योगेश आरडे, राकेश भुवड आणि आशीष पटवा यांनी यासाठी गेले वर्षभर मेहनत घेतली असून दिग्विजय यादव यांनी हे अ‍ॅप बनवले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुर्ला येथील न्यू मिल मैदानावर रविवारी २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी या अ‍ॅपचे उद्घाटन करण्यात येणार आहे. 

केवळ रक्तदात्यांच्या यादीपुरते मर्यादित न राहता मोठय़ा आजारांसाठी आर्थिक मदत करणाऱ्या संस्था, डायलिसिस केंद्र, हृदय तसेच कर्करोग उपचार केंद्र, रुग्णवाहिका, २४ तास उघडी असणारी औषधांची दुकाने, जेनेरिक औषध दुकाने, पॅथॉलॉजी केंद्र, बर्न रुग्णालय, फिजिओथेरपी केंद्र एवढेच नव्हे तर अवयवदानासंदर्भातील माहिती देणारी केंद्रे यांची माहिती या अ‍ॅपमध्ये देण्यात आली आहे. 

बहुतेकवेळा पालिका व शासनाच्या रुग्णालयामधून उपचारानंतर घरी जाणाऱ्या रुग्णांना वॉटरबेडपासून व्हीलचेअपर्यंत अनेक वस्तू लागत असतात. या गोष्टी विकत घेण्याची ऐपत नसणाऱ्यांसाठी काही संस्था या वस्तू भाडय़ाने अथवा मोफत देण्याचे काम करतात. तथापि या संस्थांचे प्रमाण कमी असून त्यांचा नेमका पत्ता बरेच वेळा रुग्णांना माहीत नसतो. रुग्णांना रक्तासह लागणाऱ्या वेगवेगळ्या आवश्यक गोष्टींचा विचार करून हे ‘एम-हेल्थ’ अ‍ॅप बनविण्यात आले आहे. हे अ‍ॅप कोणीही मोफत डाऊनलोड करू शकतो.