ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शिल्पीचे ते अपहरण नव्हतेच, प्रियकरासोबत स्वत:च पळाली

मुंबई, दि. १८ (प्रतिनिधी) - विरारमधील शिल्पी वर्मा अपहरणनाट्याचा  अखेर खुलासा झाला आहे. शिल्पी वर्माचे ते अपहरण नव्हतेच, प्रियकरासोबत ती स्वत:च पळून गेली होती. प्रियकरासोबत ती विदेशात निघून जाण्यासाठी तिने अपहरणाचा बनाव रचला. मात्र, त्याआधीच शिल्पी तिच्या प्रियकरासह पोलिसांच्या तावडीत आली व तिचे बिंग फुटले.

सध्या विरारमधील उच्चाभ्रू वस्तीत राहणारी ४० वर्षीय शिल्पी वर्मा पती व आपल्या २१ वर्षीय मुलीसोबत राहते. शिल्पीचा पती वापी येथील एका टेक्सटाईल कंपनीत 'व्हाईस प्रेसिडेंट' पदावर कार्यरत आहेत. तर मुलगी महाविद्यालयात जाते. स्वत: एमबीए पदवीधर असलेली शिल्पीचे काही वर्षापूर्वी एका हॉटेलात शेफ असलेल्या ३० वर्षीय अमरेश कुमार भगवान सिंग सोबत सोशल मिडियातून ओळख झाली व पुढे ओळखीतून मैत्री, प्रेमसंबंध ते लग्नापर्यंत हे प्रकरण गेले. 

शिल्पी वर्मा अमरेशच्या प्रेमात अखंड बुडाली होती. मात्र, तिच्या पतीचे एक प्रतिष्ठित कुटुंब आहे. अमरेशसोबत पळून गेले तर कुटुंबियांची मोठी बदनामी होईल, आपली २१ वर्षीय मुलगी तिरस्कार करेल या भीतीने शिल्पी शांत होती. २०१३ साली कोलकात्याहून रेल्वेने दिल्लीकडे जात असताना शिल्पी मध्येच कानपूर येथे उतरून अमरेश कुमार सोबत काही दिवसासाठी पळून गेली होती. 

पतीची माफी मागितल्यानंतर हे प्रकरण न वाढवता पतीने तिला मोठ्या मनाने माफ केले होते. त्यानंतर शिल्पीच्या पतीने मुंबई नोकरीला येण्याचा निर्णय घेतला. शिल्पी विरारमध्ये आल्यानंतर अमरेशने याच परिसरातील हॉटेल शोधले व नोकरी करू लागला. मात्र, काही महिन्यापूर्वी अमरेशने येथील नोकरी सोडून आपले मूळगाव पंजाब गाठले. इकडे शिल्पीला अमरेशची आठवण स्वस्थ बसू देत नव्हती. शिल्पीने अमरेशला फोनद्वारे संपर्क साधला व अपहरणाचा बनाव रचण्याचा प्लॅन आखला. त्यानुसार अमरेश जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पंजाबहून विरारमध्ये आला. काही दिवस राहिल्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला व भारतात न राहता विदेशात जाण्याचे ठरविले.

शिल्पी व अमरेशने ठरल्याप्रमाणे २ फेब्रुवारी रोजी पळून जाण्याचे नियोजन केले. शिल्पीने त्यासाठी आपली मैत्रिण नुपूर श्रीवास्तव (५०) हिला सोबत घेतले व शॉपिंगला दुपारच्या वेळेस घेऊन गेली व पुढे गाडी धडकवण्याचे नाटक व अपहरणनाट्य घडवून आणले. शिल्पीने यासाठी आपली मैत्रिण नुपूर हिला अंधारात ठेवल्याचे सांगितले जात आहे.

शिल्पीचे अपहरण झाल्यानंतर तिच्या मैत्रिणाने दिलेल्या माहितीनुसार पालघर पोलिसांनी ५ तपास पथके नेमली होती. शिल्पीची मैत्रिण नुपूर कुमारी श्रीवास्तव यांनी विरारमधील अर्नाळा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली होती. 

शिल्पीने त्या दिवशी घरीच फोन ठेवले होते. त्यामुळे तिचे अपहरणाबाबत संशय होता. पोलिसांनी तिच्या मोबाईलचे रेकॉर्ड तपासले असता ती पंजाबमधील एका तरूणाच्या संपर्कात असल्याचे लक्षात आले.  त्यानुसार पोलिसांनी पंजाबात शोधाशोध केली असता १० दिवसांनी ते दोघेही तेथे आढळून आले.

शिल्पी तेथे अपहरणकर्त्यांसमवेत राहत होती. तिचे अपहरण झाले नसल्यासारखे तिचे वर्तन होते हे पोलिसांनी लागलीच ओळखले. अपहरणाचा जो घटनाक्रम सांगितला जात होता तो ही संशयाच्या भोवऱ्यात होता. १४ व्या दिवशी शिल्पी व अपहरणकर्त्याला पंजाबातून ताब्यात घेतले. आता या दोघांना विरार येथे आणले आहे. आज दोघांना कोर्टात हजर करण्यात आले आहे.