ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रेल्वे ट्रॅक दुरुस्तीचे काम करणार्‍या ४ गॅंगमन्सचा लोकलच्या धडकेने मृत्यू

मुंबई, दि. १९ (प्रतिनिधी) - रेल्वे ट्रॅक दुरुस्तीचे काम करणार्‍या चार कर्मचार्‍यांचा लोकल ट्रेनची धडक बसून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना काल (शुक्रवारी) घडली आहे. रेल्वे रुळ दुरुस्तीचे  काम करत असताना लोकलची धडक बसल्याने रेल्वे कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्‍यात आले. मात्र, उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला.

घाटकोपर-विद्याविहार स्टेशनदरम्यान हा अपघात झाला होता. रेल्वेचे काही कर्मचारी ट्रॅक दुरुस्तीचे काम करत होते. त्यापैकी चौघांना सीएसटीकडे जाणार्‍या लोकलची धडक बसली.