ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त मुलांची वर्षा बंगल्याला भेट

मुंबई, दि. २३ (प्रतिनिधी) - "मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त मुलांनी खचून न जाता धीराने परिस्थितीला तोंड द्यावे. या मुलांनी स्वतःला एकटे समजू नये. जशी मला माझी मुलगी आहे, तशीच आजपासून तुम्ही पण माझीच मुले आहात" अशा शब्दात महराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भारतीय जैन संघटनेच्या वाघोली येथील शैक्षणिक व पुनर्वसन प्रकल्पातून भेटीस आलेल्या मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांशी संवाद साधला.

ही मुले मुंबई भेटीस येत असल्याचे समजल्यावर अमृता यांनी या सर्व मुलांना आपल्या "वर्षा" या निवासस्थानी भेटीचे व भोजनाचे आमंत्रण दिले. मुलांच्या स्वगाताकरता "वर्षा" बंगल्यावर मांडव टाकण्यात आला होता. अतिशय मोकळेपणाने अमृता यांनी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुलींशी खास करून बोलताना अमृता यांनी त्यांना कुणाचेही दडपण न ठेवता  स्वतःच्या पायावर उभे राहावे असे आवाहन केले. सुमारे दोन तास चालेल्या या भेटीमध्ये अमृता यांनी स्वतः मुलांसोबत जेवण घेऊन त्यांच्यासोबत अत्यंत साधेपणाने वावरल्या. या वेळी त्यांची कन्या दिविजा ही देखील आवर्जून उपस्थित होती. अमृता यांच्या हस्ते मुलांना शालोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. तसेच मुलांशी बोलताना अमृता फडणवीस यांनी कुठल्याही भविष्यातील अडचणीकरता गरज वाटल्यास त्यांना स्वतःला थेट संपर्क करण्याचे आवाहन केले व काही संपर्काचे क्रमांक सुद्धा मुलांना दिले. अमृता यांनी वाघोली येथील प्रकल्पाबाबत विस्तृत माहिती घेतली.

जानेवारी महिन्यामध्ये राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी वाघोली येथील प्रकल्पास भेट दिली होती. या वेळीच राज्यपालांनी मुलांना राजभवन भेटीचे खास निमंत्रण दिले होते.राज्यपाल नुसतेच निमंत्रण देऊन न थांबता पुढे त्यांनी या भेटीकरता त्यांच्या कार्यालयामार्फत संघटनेशी संपर्क साधला आणि म्हणूनच या सर्व मुलांना राजभवन भेटीस जाण्याची संधी मिळू शकली. भेटीदरम्यान राज्यपाल व त्यांच्या पत्नी यांनी सर्व मुलांपाशी स्वतः जाऊन त्यांची विचारपूस केली. अगदी राजभवनातील दरबार हॉल सहित सर्व परिसराची पाहणी यावेळी हे मुले करू शकली. सुमारे तीन तास येथे रमलेल्या विद्यार्थ्यांनी राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवनातील हिरवळीवर अल्पोपहार केला. या वेळी मुलांच्या इच्छेखातर झी मराठी वाहिनीवरील मालिकांमधील मराठी कलाकार उपस्थित होते.

मुलांनी मुंबईमधील काही स्थळांना भेटी देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे गोरेगाव येथील चित्रनगरी मधील झी वाहिनीच्या स्टुडीओ भेटीस नेण्यात आले. यावेळी 'झी' चे अध्यक्ष सुभाष चंद्र गोयल यांनी सर्व मुलांशी तासभर संवाद साधला. या मुलांनी देखील गोयल यांच्याशी मोकळेपणाने बोलत आपल्यात मनातील गोष्टी उघड केल्या व काही कलाप्रकार सादर केले.

या सहली दरम्यान मुलांना मंत्रालय, गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, सी लिंक आदि ठिकाणे दाखवण्यात आली. पहिल्यांदीच मुंबईला आलेले हि सर्व मुले मुंबई दर्शनाने खूपच सुखावली. राजभवन, वर्षा येथील भेटीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसून येत होता.या भेटी दरम्यान भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतिलाल मुथ्था, पदाधिकारी व शिक्षक वर्ग उपस्थित होता. पहाटे चार वाजता वाघोलीहून निघालेली मुले रात्री एकच्या सुमाराला परत प्रकल्पस्थळी पोहोचली. सहा बस व इतर तीन वाहनांचा ताफा अतिशय शिस्तबद्धपणे मुंबईमध्ये सर्वदूर प्रवास करत होता. उत्तम नियोजनामुळे मुलांना सर्व ठिकाणी सुरक्षित व वेळेवर पोहोचता आले.