ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शिवसेना शाखाप्रमुखाची महिला पोलिसाला बेदम मारहाण

ठाणे, दि. २७ (प्रतिनिधी) - येथील नितीन कंपनी उड्डाणपुलाखाली गुरुवारी वाहतूक शाखेत कार्यरत असलेली २५ वर्षीय महिला कर्मचारी वाहतूक नियमन करत होती. त्याचवेळी शशिकांत गणपत कालगुडे (वय ४४) हा शिवसेनेचा शाखाप्रमुख सिग्नलवर गाडी उभी करून मोबाइलवर बोलत होता. सिग्नल सुटूनही तो गाडी थांबवून बोलत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे या वाहतूक पोलीस महिलेने त्याला गाडी पुढे घेण्यास सांगितले. तरी त्याने ऐकले नाही तेव्हा तिने त्याच्याकडे वाहन परवान्याची मागणी केली. संतापलेल्या कालगुडेने गाडीतून उतरून या पोलीस महिलेलाच मारहाण सुरू केली. तिचा विनयभंगही त्याने केला. या घटनेत ही पोलीस महिला जखमी झाली आणि तिच्या नाकातोंडातून रक्त आले. 

या प्रकाराने संतापलेल्या नागरिकांनी त्याला पकडून नौपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. कालगुडे याच्यावर सरकारी कामात अडथळा, मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला एक दिवसाची कोठडी दिली होती. शुक्रवारी त्याला जामीन मंजूर करण्यात आला मात्र पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याने तो तुरुंगातून बाहेर येऊ शकला नाही. 

कालगुडे हा शिवसेनेचा धर्मवीरनगर भागातील शाखाप्रमुख आहे. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मात्र तो माजी शाखाप्रमुख असल्याचा दावा केला आहे. तीन हात नाका परिसरात तो वडापावची गाडीसुद्धा चालवतो. दिवसाढवळ्या ठाण्यातील नितीन कंपाऊंडसारख्या भागात पोलिसांवर हात उचलण्याचा या गुंडाचा प्रताप संतापजनक असल्याची प्रतिक्रिया महिलांनी दिली आहे. 

लातूर आणि ठाण्यात सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांकडूनच पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांच्या घटनांमुळे सत्ताधारी पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना सारे माफ आहे का, असा बोचरा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. एवढेच नव्हे तर सरकारमधूनच अशा कारवायांना पाठिंबा आहे की काय, असा प्रश्न निर्माण होतो, असे विखे-पाटील यांनी सांगितले. 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कालगुडेचा वाहन परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी दिली आहे.

 शशिकांत कालगुडेची याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. २००५ मध्ये कलगुडेवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा गुन्हा दाखल आहे. तर २००८ मध्ये खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा. २०१४ मध्ये बेकायदेशीर जमाव व दंगल असे आरोप त्याच्यावर दाखल आहेत.