ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सर्व पोलिस ठाण्यांना ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ पुरवा - उच्च न्यायालय

मुंबई, दि. २७ (प्रतिनिधी) - वाहन चालकांनी मद्यपान केले की नाही हे तपासणारे ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ हे उपकरण पुरेशा प्रमाणात पोलिसांना उपलब्ध करून दिले जात नाही. परिणामी मुंबईवगळता अन्य ठिकाणी त्याच्या वापराची अंमलबजावणी अगदी नगण्य आहे, अशा शब्दांत सरकारला सुनावत येत्या चार महिन्यांत राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ उपलब्ध करण्याचे आणि त्यासाठीचा निधी एका महिन्यात उपलब्ध करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला दिले आहेत.

पुरेशा प्रमाणात ही उपकरणे उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळेच तातडीने ती उपलब्ध करून द्यावे, असे आदेश न्यायमूती अभय ओक आणि न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांच्या खडंपीठाने दिले. 

वाहन चालकांनी मद्यपान केले की नाही हे तपासणारी उपकरणे मुबलक प्रमाणात पोलिसांकडे उपलब्ध आहेत का, अशी विचारणा करत त्याची आकडेवारी सादर करण्याचे आदेश दिले होते. 

सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रातील याबाबतची आकडेवारी सादर केली. मुंबईसह राज्यात सद्यस्थितीला केवळ ५०७ ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ उपलब्ध आहेत आणि त्यातील १९६ कार्यान्वित आहेत. तर १ हजार १७४ ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ची आवश्यकता आहे. 

मुंबई पोलिसांना ३२७ ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ची गरज आहे. मात्र त्यांच्याकडे सध्या केवळ ७८ ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ उपलब्ध आहेत. त्यातील ५४ कार्यान्वित असून २४ बंद आहेत. तर ६५ खासगी संस्थांकडून उपलब्ध करण्यात आलेली आहेत. या आकडेवारीची दखल घेत आवश्यक असलेली १ हजार १७४ ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ चार महिन्यांत व त्यासाठीचा निधी एका महिन्यात उपलब्ध करून देण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले.