ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

राजेश खन्ना यांचा बंगला जमीनदोस्त

मुंबई, दि. २७ (प्रतिनिधी) - मुंबईतील वांद्रे येथील स्व. राजेश खन्ना यांचा 'आशीर्वाद' बंगला पाडण्यास सुरुवात झाली आहे. राजेश खन्ना यांची अभिनेता ते सुपरस्टारपर्यंतची भरारी ज्या वास्तूने अनुभवली तीच आता जमीनदोस्त होत आहे. मंगळुरू येथील उद्योजक शशीकिरण शेट्टी यांनी २०१४ मध्‍ये तो विकत घेतला असून, या ठिकाणी ते आता नव्याने बांधकाम करणार आहेत.

१८ जुलै २०१२ रोजी राजेश खन्ना यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या मुली ट्विंकल आणि रिंकी यांनी हा बंगला विकण्याचा निर्णय घेतला होता. राजेश खन्ना यांच्या अखेरच्या काळात लिव्ह-इन पार्टनर म्हणून  राहिलेली अनिता आडवाणी यांनीसुद्धा या संपत्तीवर दावा केला होता.
अनिता आडवाणीने बंगला पाडून बिल्डिंग उभी राहण्याची भीती व्यक्त केली होती.

राजेश खन्ना यांनी राजेंद्रकुमार यांच्याकडून हा बंगला ६० हजार रुपयांत विकत घेतला होता. या बंगल्यात भुते असल्याची वदंता होती. त्यामुळे त्यांनी राजेंद्रकुमार यांनी तो विकला. राजेश खन्ना यांनी हा बंगला विकत घेतल्यानंतर त्यांची कारकीर्द बहरत गेली व ते सुपरस्टार बनले. पुढील काळात खन्ना यांच्या पत्नी डिंपल कपाडिया व दोन्ही कन्या त्यांना सोडून गेल्यावर ते एकटेच या ठिकाणी राहत होते.