ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

फुकट वडापावसाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची दुकानदाराला बेदम मारहाण

मुंबई, दि. २९ (प्रतिनिधी) - ठाण्यामध्ये एका महिला पोलिस हवालदाराला सेनेच्या शाखाप्रमुखाने बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडल्यानंतर आता विलेपार्ले येथे दुकानदाराने १०० वडापाव फुकटे दिले नाही म्हणून त्याला बांबूने बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना शनिवार, २६ फेब्रुवारीला घडली आहे.

मुंबईच्या विलेपार्ले पश्चिम इथल्या तृप्ती फरसाण मार्टचे मॅनेजर चेतन पटेल यांना युवासेना पदाधिकाऱ्याने मारहाण केली. सुनील महाडीक असे या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने ‘साहेब क्रिकेट चषक’ आयोजित करण्यात आलं होतं. या सामन्यांसाठी तृप्ती फरसाण मार्टच्या मालकानं १०० वडापाव फुकट दिले नाहीत, म्हणून युवासेना पदाधिकाऱ्याने दुकानाच्या मॅनेजरला बेदम मारहाण केली. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

तृप्ती फरसाण मार्टचे मॅनेजरला कूपर रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून सुनील महाडीकवर जुहू पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करून गुन्ह्याची नोंद करत पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

एकीकडे शिवसैनिकांची चांगली कामं माध्यमांना दिसत नाहीत, अशी टीका उद्धव ठाकरेंकडून होत असतांना शिवसैनिकांच्या दादागिरीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. एका वृत्त वाहिनीने हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर युवासेना पदाधिकारी सुनील महाडिकची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.