ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भाजपाच्या राज्यात डान्सबारला अच्छे दिन – राज ठाकरे

मुंबई, दि.३ (प्रतिनीधी) - राज्यात डान्स बार पुन्हा सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहेत. ‘अब कि बार, डान्स बार’ असं म्हणत राज ठाकरे यांनी राज्यशासनावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून डान्सबारच्या मुद्याला हात घालत राज्य शासनावर शरसंधान साधले आहेत.

डान्स बारमालकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत छुपा करार झाला आहे, पडद्या पाठीमागे मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे, असा आरोप करत सरकारचे अब की बार डान्स बार हेच धोरण असल्याची खरमरीत टीका राज ठाकरे यांनी केली आहे. तसंच, डान्सबार सुरू करण्याबाबत राज्य सरकार जितकी आस्था दाखवते तितकी सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत दाखवल्यास जनता त्यांना दुवा देईल, असंही ते म्हणाले.

आजचे मुख्यमंत्री विरोधात असताना डान्स बार बंदीच्या मुदद्यावर तत्कालिन आघाडी सरकारवर तुटून पडायचे. मात्र, आता सुप्रीम कोर्टात बाजू मांडताना कमी पडल्याने राज्यात पुन्हा डान्सबार सुरू होणार आहेत. अशावेळी मुख्यमंत्र्यांचा गृहपाठ कमी पडला की त्यांची इच्छाशक्ती, असा सवाल ठाकरे यांनी ट्विटरवर केला आहे.