ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

ऊर्मिलाने केले ९ वर्षे वयाहून लहान असलेल्या तरुणाशी लग्न

मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी) - सध्या बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींमध्ये आपल्यापेक्षा वयाने बऱ्याच लहान असलेल्या तरुणांशी लग्न करण्याची क्रेझ पसरली आहे. प्रिती झिंटाने नुकतेच लॉस एंजिलिसमध्ये तिच्यापेक्षा  १० वर्षांनी लहान असलेला अमेरिकन ब्वॉयफ्रेंड जीन गुडइनफ याच्‍यासोबत लग्‍न केले. तर आता उर्मिला मातोंडकरनेही तिचा कित्त गिरवत आपल्यापेक्षा ९ वर्षाने लहान असलेल्या मोहसिन अख्तर मीर यांच्‍यासोबत लग्‍न केले आहे. अभिषेक बच्चनही ऐश्वर्यापेक्षा २ वर्षांनी लहान आहे.

मोहसिन अख्तर मीर हा काश्मिरी बिझनेसमन आणि मॉडेल असून त्याचे वय ३३ आहे. ४२ वर्षीय उर्मिलाने या लग्‍नसोहळ्याबाबत अत्‍यंत गुप्‍तता बाळगली. या सोहळ्यात बॉलीवुडचे काही सेलिब्रिटी, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा सहभागी होते. या लग्‍नसोहळ्याला माध्‍यमांपासूनही दूर ठेवण्‍यात आले. लग्‍नानंतर दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्‍हायरल झाले. 

रामगोपाल वर्मा यांच्‍या रंगीला या चित्रपटाने उर्मिलाला विशेष ओळख दिली. रंगीलानंतर ती ‘रंगीला गर्ल’ नावानेच ओळखल्‍या जाऊ लागली. पुढे उर्मिला रामगोपाल वर्मा यांची फेवरेट एक्ट्रेस बनली. 

उर्मिलाने तिच्‍या करिअरमध्‍ये केलेले चित्रपट - ‘चमत्कार’ (१९९२), ’रंगीला’ (१९९५), ’जुदाई’ (१९९७), ’सत्या’ (१९९८), ’मस्त’ (१९९९), खूबसूरत (१९९९), ’प्यार तूने क्या किया’ (२००१) आणि ’भूत’ (२००३). 
- उर्मिला २०१४ मध्‍ये मराठी चित्रपट ‘आजोबा’मध्‍येही दिसली होती. त्‍यानंतर तिने चित्रपट केला नाही.