ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

गिरगावमध्ये बोअरवेलमध्ये पडून दोघांचा मृत्यू

मुंबई, दि. ६ (प्रतिनिधी) -  येथील गिरगाव एरियातील एका ४० फूट खोल असलेल्या बोअरवेलमध्ये पडलेल्या दोघा जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आज (रविवार) दुपारी १२ च्या सुमारास घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. दोन्ही मृत व्यक्ती बोअरमध्ये कशा पडल्या व त्यांची नावे काय आहेत याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

गिरगाव फणसवाडी येथील जव्हार मेन्शन सोसायटी परिसरात असलेल्या अडीच फूट व्यास आणि ४० फूट खोल असलेल्या बोअरवेलमध्ये दुपारी १२ च्या सुमारास दोघेजण पडले. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. त्या दोघांना शिडीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. मात्र दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तत्काळ नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असतानाच त्या दोघांचाही मृत्यू झाला आहे.