ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कबड्डी खेळू दिले नाही म्हणून वरवंट्याने केली आई-वडिलांची हत्या

मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) - ठाणे जिल्ह्यातील वासिंद गावामध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सागर दिनकर नावाच्या अल्पवयीन मुलाने आपल्या आई-वडिलांची हत्या केली आहे. ही घटना आज (मंगळवार) सकाळी घडली आहे. सूत्रांनी सांगितले की, सागरच्या कबड्डी खेळण्यावरून गेले काही दिवस त्याच्यात आणि आई-वडिलांमध्ये भांडण चालू होते. सागरचे आई-वडील सागरला कबड्डी खेळू देत नव्हते.

काल (सोमवार) रात्रीही याच विषयावरून सागरमध्ये आई-वडिलांमध्ये भांडण झाले होते. भांडण इतके टोकाला गेले की, सागरने क्रोधाच्या भरात आपल्या आई-वडिलांची हत्या केली. सागर एका कंपनीमध्ये हेल्पर म्हणून काम करत होता.

या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सागर अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, सागरने वरवंट्याने आपल्या आई-वडिलांची हत्या केली आहे. शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, सागर आणि त्याचे आई-वडील यांच्यात नेहमीच भांडणे होत असे.