ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पाणी भरण्यावरून झालेल्या भांडणानंतर पत्नीने पतीला भोसकले

डोंबिवली, दि. १४ (प्रतिनिधी) - या वर्षी पावसाने राज्याला दगा दिला. संपूर्ण राज्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. याचे दुष्परिणाम आता हळू हळू जाणवू लागले आहेत. सर्वच शहरांमधून पाणी कपात करण्यात येत आहे. डोंबिवलीमध्येही पाणी कपात सुरू आहे. 

डोंबिवलीमध्ये वेळीअवेळी पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. काल (रविवार) रात्री १० वाजता दोन दिवसांनी नळाला पाणी आले होते. येथील एक व्यावसायिक चिराग शहा यांनी आपली पत्नी अर्चना (वय ३८) हिला पाणी भरण्यास सांगितले. पाणी कोणी भरावयाचे यावरून दोघा पती-पत्नीमध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. 

चिडलेल्या अर्चनाने भाजी कापण्याच्या सुरीने चिराग यांच्या बरगडी, पोट आणि हातावर सपासप वार केले. यात चिराग गंभीर झाले. गंभीर जखमी झालेल्या चिराग यांना शेजाऱ्यांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अर्चना हिला अटक केली आहे.