ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पत्नी पुरुषांना भुरळ घालायची; नवरा छापा टाकून लुटायचा

मुंबई, दि. १५ (प्रतिनिधी) - पत्नी ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवून पुरुषांना भुरळ घालायची. ग्राहकांना घेऊन लॉजवर गेली की नवरा सीआयडी ऑफिसर बनून धाड घालायचा आणि ग्राहकाकडून कारवाई न करण्यासाठी पैसे लुबाडायचा. पोलिसांनी दोघा पती-पत्नीला या प्रकरणी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंधेरी येथील मोहम्मद फैजल (वय ३४) आणि त्याची पत्नी नीता खोरा (वय ३२) हे दोघेही ग्राहकांना लुटायचे धंदे करत असे. नीता हिने गुगलवर बनावट अकाऊंट उघडून त्या द्वारे पुरुषांना सेक्ससाठी आकर्षित करत असे. ती इतर मुलींच्या साहाय्यानेदेखील सेक्स रॅकेट चालवत आहे. एखादा बिझनेसमन तिच्या जाळ्यात फसला की नीता एखाद्या लॉजमध्ये त्याला बोलावून घ्यायची. थोड्या वेळाने मोहम्मद फैजल हा सीआयडी अधिकारी बनून छापा मारत असे आणि त्याच्याकडून कारवाई न करण्यासाठी भरपूर पैसे घेत असे.

अंधेरी येथे अशीच घटना घडली. एका बिझनेसमनला नीताने एका लॉजवर बोलावले. ठरल्याप्रमाणे मोहम्मदने तिथे धाड घातली. बिझनेसमन समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्ती होती. त्यामुळे त्याने कारवाई न करण्यासाठी विनवणी केली. तेव्हा मोहम्मदने त्याच्याकडून १ लाख ३५ हजार रुपये उकळले शिवाय त्याची चार लाख रुपये किमतीची होंडा कारही बळकावली.

बिझनेसमनने वनराई पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी दोघा पती-पत्नीला मालाडमधून अटक केली. त्यांच्यावर कलम ४२० आणि १७० लावण्यात आले आहे. या दोघांनी आणखी कोणाकोणाची फसवणूक केली आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.