ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

किंगफिशर हाऊसचा आज होणार लिलाव

मुंबई, दि. १७ (प्रतिनिधी) - स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक समूह याच्यातर्फे मुंबईतील किंग फिशर हाऊसचा लिलाव आज (गुरुवार) केला जाणार आहे. हा ई ऑक्शन सकाळी साडेअकरा वाजता सुरू होत असून तो मध्यरात्री साडेबारापर्यंत चालू राहणार आहे. यासाठी सुरवातीची बोली १५० कोटी रूपये असल्याचे स्टेट बँक ट्रस्ट समुहाकडून स्पष्ट कले गेले आहे. ही मालमत्ता गतवर्षी बँकेने ताब्यात घेतली होती.

मुंबईच्या विलेपार्ले येथील ही इमारत २४०१ चौरस मीटरची असून ती किंगफिशरची सर्वात मोठी प्रॉपर्टी मानली जाते. मेट्रोपोलिटन मॅजिेस्ट्रेटची ऑर्डर मिळाल्यानंतर किंगफिशरच्या मालमत्ता जप्त करण्याचा हक्क बँक ट्रस्टला मिळाला असून फेब्रुवारी २०१३ पासून बँक ट्रस्ट ने रिकव्हरी प्रक्रिया सुरू केली आहे. किंगफिशर एअरलाईन आक्टोबर २०१२ पासून बंद असून त्यांचे फलाईंग परमिट २०१४ साली रद्द केले गले आहे.

किंगफिशरचे मालक विजय मल्या यांनी सर्वाधिक कर्ज स्टेट बँकेकडूनच घेतले असून ही रक्कम आहे १६०० कोटी रूपये. किंगफिशर मुंबई लिलावानंतर गोव्यातील किंगफिशर व्हीलाचाही लिलाव केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या व्हीलाची किंमत आहे ९० कोटी रूपये. किंगफिशर एअर सेवा बंद झाल्यानंतर भाडेवसुलीसाठी मुंबई आंतरराष्ट्रीय प्राधीकरणाने माल्या यांचे जेट २२ लाख रूपयांना भंगारात विकले असल्याचेही समजते. हे ११ सीटर जेट ३० वर्षे जुने होते.