ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बंदर विकासामुळे होणार १ कोटी रोजगारनिर्मिती : गडकरी

मुंबई, दि. १९ (प्रतिनिधी) - बंदर आणि नौवहन क्षेत्रामध्ये आगामी पाच वर्षात प्रत्यक्ष ४० लाख तर अप्रत्यक्ष ६० लाख रोजगार निर्मिती करण्याची क्षमता असल्याचे केंद्रीय नौवहन, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

पुढील महिन्यात होणाऱ्या ‘मेरीटाईम इंडिया समिट’च्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत हेाते. सर्व विकसित देशांमध्ये बंदर क्षेत्राचा विकास झाला आहे. मात्र गेल्या कित्येक वर्षात आपल्याकडील सागरी क्षेत्र मात्र दुर्लक्षित राहिले आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

बंदर विकासासाठी मंत्रालयाकडून १ लाख २० हजार कोटी रुपये गुंतवणूक क्षमतेचे प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे गडकरी म्हणाले. मुंबईत १४ ते १६ एप्रिल दरम्यान होणाऱ्या ‘मेरीटाईम इंडिया समिट’ मध्ये हे प्रकल्प सादर केले जाणार आहेत. यामध्ये २७ बंदर आधारित औद्योगिक क्लस्टर, किनारपट्टी नौवहनाला प्रोत्साहन आणि देशांतर्गत वाहतुकीचा विकास आदी प्रकल्पांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय उत्पादनाबरोबरच निर्यात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्या देशातील वाहतूक खर्च कमी करणे अत्यंत गरजेचे आहे; असे ते म्हणाले. सध्या देशातील वाहतूक खर्च १८ टक्के असून, युरोपमध्ये तो १० ते १२ टक्के आहे. किनारपट्टी नौवहन आणि देशांतर्गत वाहतूक विकासाच्या माध्यमातून आपल्या देशातील वाहतूक खर्च १८ टक्क्यांवरुन १२ टक्के करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी नमूद केले. जलवाहतूक हे अत्यंत कमी खर्चीक असल्याचे ते म्हणाले.

सरकारच्या वतीने हाती घेतलेल्या प्रमुख उपक्रमांबाबत बोलताना गडकरी म्हणाले की, २० हजार १५७ कोटी रुपये गुंतवणुकीतून महाराष्ट्रात डहाणूजवळ वाधवान, तामिळनाडूमध्ये कन्याकुमारीजवळ कोलाचेल आणि पश्चिम बंगाल येथे सागर ही नवीन हरित क्षेत्र बंदर विकसित केली जाणार आहेत. जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि पुनर्वापर यासाठी गुजरात मधील सौराष्ट्र आणि तामिळनाडू मधील एन्नोर अशी दोन मरीन क्ल्स्टरर्स निश्चित करण्यात आल्याचे गडकरी म्हणाले. त्याचप्रमाणे दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर तामिळनाडूत कोस्टल स्टील क्लस्टरर्स निश्चित करण्यात आले आहेत. १११ देशांतर्गत जलवाहतुकीच्या विकासामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक संधी निर्माण होणार असल्याचे ते म्हणाले.

मुंबईत १४ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेरीटाईम इंडिया समिटचे उद्‌घाटन होणार असल्याचे नौवहन मंत्रालयाचे सचिव राजीव कुमार यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमादरम्यान गुंतवणूकदार समिट, चर्चा सत्र, बी२बी आणि जी२बी बैठका यांचे आयोजनही करण्यात आले आहे. दक्षिण कोरिया या उपक्रमात भागीदार देश म्हणून सहभागी होत आहे. ५७ देशातील प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.