ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मुंबईच्या महापौर निधीत 50 टक्क्यांची कपात

मुंबई, दि. २० (प्रतिनीधी) - कंत्राटदारांशी आर्थिक हितसंबंध असल्याच्या आरोपानंतर अडचणीत आलेल्या मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकरांना मुंबई महापालिका आयुक्तांनी मोठा झटका दिला आहे. महापौर स्नेहल आंबेकरांना मिळणारा महापौर निधी थेट पन्नास टक्क्य़ांनी कमी करण्यात आला आहे.

महापौर निधी थेट 50 टक्क्यांनी कमी केल्यानं 2016-17 या आर्थिक वर्षासाठी स्नेहल आंबेकरांना महापौर निधीपोटी 100 कोटींऐवजी फक्त 50 कोटी मिळणार आहेत.

कंत्राटदारांच्या मागणीनुसार महापौरांकडून नगरसेवक निधीचं वाटप होतं, असा आरोप मनसेकडून केला जातो आहे. तसंच नगरसेवकांच्या मागणीपत्रा शिवाय देखील स्नेहल आंबेकरांनी निधी मंजूर केल्याचा आरोप मनसेच्या संदीप देशपांडेंनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर आंबेरकरांच्या निधीला कात्री लावण्यात आल्याचं बोललं जातं आहे.

तर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला शह देण्यासाठी मित्र आणि विरोधकांनी एकत्रित येऊन ही खेळी खेळल्याचा आरोप सेना नेत्यांनी केला आहे.