ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

राज ठाकरे यांचा कार्यकरर्त्यांना सल्ला...

रंगपंचमी खेळणाऱ्यांना हात जोडा, नाही तर...
मुंबई, दि. २० (प्रतिनीधी) - मुंबईतील उत्तर भारतीय होळी साजरी करताना पाण्याचा अपव्यय करत असतील तर, त्यांना आधी हात जोडून समजवा. तरीही त्यांना कळत नसेल तर त्यांची धुलाई करा असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकरर्त्यांना दिला आहे. ठाण्यामध्ये बैठक घेऊन त्यांनी उत्तर भारतीयांवर निशाणा साधला आहे.

यंदा राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने पाण्याविना रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी ठाण्यात कार्यकर्त्यांना केले. तसेच रंगपंचमीसाठी पाण्याचा वापर करणाऱ्यांपुढे आधी हात जोडा आणि त्यानंतरही त्याच पद्धतीने ते रंगपंचमी करत असतील तर मात्र त्यांच्यावर हात सोडा, असे आदेश त्यांनी या वेळी कार्यकर्त्यांना दिले.

ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना त्यांनी पाण्याविना रंगपंचमी साजरी करण्याचे आदेश दिले. यंदा राज्यात दुष्काळाची परिस्थिती असून सर्वानाच पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे होळीनिमित्ताने होणाऱ्या पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच इतरांनाही पाण्याविनाच रंगपंचमी साजरी करण्यासाठी हात जोडून विनंती करण्याच्या सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. 

त्याचप्रमाणे रंगपंचमीसाठी पाण्याचा वापर होत असेल तर संबंधितांना आधी विनंती करा आणि त्यानंतरही त्यांनी ऐकले नाही तर मग त्यांच्यावर हात सोडण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. या आदेशामुळे होळी सणाच्या काळात तवाणाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.