ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

समीर भुजबळ ३१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत

>> सुनावणीसाठी जेलबाहेर आल्यावर मारला वडा-पाववर ताव

मुंबई, दि. २१ (प्रतिनिधी) - विशेष ईडी न्यायालयाने आर्थिक गैर व्यवहारप्रकरणी माजी खासदार समीर भुजबळ यांना ३१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास आता महत्वाच्या टप्प्यावर असल्याने ईडीने समीर भुजबळांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मुंबई विशेष ईडी न्यायालयाने आज (सोमवार) समीर भुजबळ यांची रवानगी ३१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत केली. दरम्यान, समीर भुजबळ यांनी सुनावणीसाठी जेलबाहेर आल्यानंतर न्यायालयाच्या  आवारात वडापाव आणि चटणी सँडवीचवर ताव मारला.

१४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर माजी खासदार समीर भुजबळ यांना अंमलबजावणी संचालनालयाने पुन्हा विशेष ईडी कोर्टात हजर केले होते.‎ ईडीने आज न्यायालयात सादर केलेल्या रिमांड पत्रानुसार समीर भुजबळ संचालक असलेल्या कंपन्यांमार्फत या कंपनीत जवळपास ३० कोटी रुपयांचे नवीन व्यवहार आढळले आहेत. जे रोख आणि चेक मार्फत हे पैसे दोन कंपन्यांना वळते करण्यात आले आहेत. त्याआधारे आणखी तपास करावयाचा असल्याने ईडीने समीर भुजबळांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती.

गेल्या सुनावणीच्या वेळेस ईडीने न्यायालयात सादर केलेल्या रिमांड पत्रानुसार समीर भुजबळ संचालक असलेल्या कंपन्यांतून जवळपास ८७० कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा माहिती ईडीने कोर्टाला दिली होती. त्यापैकी १७० कोटी रुपयांचे कागदोपत्री पुरावे सापडले असून, समीर भुजबळ यांच्या कंपन्यांचे शेअर्स ठेकेदारांनी चढत्या भावाने विकत घेवून, समीर भुजबळ यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. त्या बदल्यात गुंतवणूकदारांना सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विविध कामे देण्यात आली.

शिवाय १२५ कोटी रुपये समीर भुजबळ संचालक असलेल्या कंपन्यांनी विविध ठिकाणी गुंतवणूक केली. त्याबाबत समीर भुजबळ योग्य ते पुरावे देऊ शकले नाहीत. या सर्व कोट्यावधी रुपयांच्या अफरातफरीची चौकशी करण्यासाठी ईडीला वेळ हवा असल्याने ईडीने समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती.