ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

महाधिवक्ता श्रीहरी अणे यांचा अखेर राजीनामा

>> अणेंविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा- शिवसेना

मुंबई, दि. २२ (प्रतिनिधी) - वेगळ्या विदर्भाची कायम मागणी करणारे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी सोमवारी स्वतंत्र मराठवाड्याची मागणी करून राज्यात खळबळ उडवून दिली होती. विविध स्तरावरुन झालेल्या टीकेमुळे अखेर अणे यांनी मंगळवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. दरम्यान, शिवसेनेने अणेंविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

दुसरीकडे, अणेंच्या वक्तव्याचे मंगळवारीही विधिमंडळात पडसाद उमटले. शिवसेना व विरोधक एकत्र आले. अणे यांनी सभागृहाची माफी मागावी, अशी घोषणाबाजी करण्यात आली. अणेंचे वक्तव्य राज्यासाठी घातक असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले तर अणे यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत कामकाजात सहकार्य करणार नसल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. दरम्यान, अणे यांच्या स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

स्वतंत्र मराठवाड्याची मागणी करणारे अणे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. त्यानंतर अणे यांनी राज्यपाल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. मात्र, अणे यांनी राजीनामा देऊन काहीही होत नाही, त्यांनी जाहीर माफी मागावी, असे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

जालना येथील कार्यक्रमात अणेंनी केलेल्या स्वतंत्र मराठवाड्याबद्दलच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटले. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख विरोधी पक्ष आणि सत्ताधारी शिवसेनेनेही अणेंच्या हकालपट्टीची मागणी केली. या मागणीसाठी भाजप वगळता सर्वपक्षीय आमदार हौद्यात उतरल्यामुळे झालेल्या गोंधळात सभागृहाचे कामकाज अगोदर पाच वेळा आणि शेवटी दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.

जालना येथे मराठवाडा मुक्ती मोर्चाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अणेंनी स्वतंत्र मराठवाडा राज्याच्या मागणीचे बिगुल फुंकले होते. त्यावरून सोमवारी सकाळी विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी नियम २३ अंतर्गत विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांच्याकडे एक प्रस्ताव सोपवून अणेंना महाधिवक्तापदावरून हटवण्याची मागणी केली. प्रस्तावावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील आणि सपचे अबू आझमी यांचा समावेश आहे.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अणेंच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी अशी मागणी केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनीही अणेंच्या वक्तव्याचा सोक्षमोक्ष लावण्याची मागणी केली. महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणार्‍या अणेंना कोणाचा पाठिंबा आहे, याचा एकदा खुलासा झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.

शिवसेनेच्या प्रताप सरनाईक आणि गुलाबराव पाटील यांनीही विरोधकांच्या सुरात सूर मिसळत अणेंच्या हकालपट्टीची मागणी केली. दिलीप वळसे पाटील यांनी राज्यपालांना भेटून अणेंच्या हकालपट्टीचा ठराव पारित करण्याची मागणी केली. घटनेच्या कलम 165चा भंग अणेंनी केल्याचेही वळसे म्हणाले. सभागृहाच्या भावना पाहता संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सर्व पक्षिय गटनेत्यांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यावर समाधान न झाल्याने सर्व सदस्य हौदात उतरले आणि त्यांनी अणेंच्या विरोधात घोषणा द्यायला सुरूवात केली. त्यानंतर तब्बल पाच वेळा कामकाज तहकूब करण्यात आले.