ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भुजबळांच्या संपत्तीवर टाच

>> नाशिकमधील गिरणा कारखाना; २९० एकर जमीन जप्त

मुंबई, दि. २२ (प्रतिनिधी) - सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली अटकेत असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. भुजबळांच्या कंपनीच्या मालकीची नाशिकमधील २९० एकर जमीन आणि साखर कारखाना जप्त केला. त्याची किंमत ५५ कोटी रुपये आहे.

ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यान्वये आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर या भुजबळांच्या कंपनीच्या मालकीच्या गिरणा साखर कारखाना आणि त्याला लागून असलेल्या २९० एकर जमिनीवर जप्ती आणली. जप्ती आदेशात या मालमत्तांची किंमत ५५ कोटी नमूद केली आहे. ईडीने साखर कारखाना सुरू ठेवण्यावर बंदी घातली आहे. २७ कोटी रुपयांपेक्षा कमी मूल्यमापन करून भुजबळांच्या कंपनीने गिरणा साखर कारखाना खरेदी केला होता. २०१० मध्ये ऋण वसुली न्यायाधिकरणाने केलेल्या लिलावात भुजबळांच्या कंपनीने तो खरेदी केला होता. त्याच्या खरेदीसाठी भुजबळ व कुटुंबीयांनी मनी लाँडरिंगमार्फत मिळालेल्या पैशाचा वापर केला होता, असे ईडीच्या तपासात निष्पन्न झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

गिरणा साखर कारखाना आणि २९० एकर जमीन भुजबळांच्या मेसर्स आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. ने लिलावातून घेतली होती. त्यात १० कोटी रुपयांच्या कर्जाव्यतिरिक्त १७,८२,५५,०१० रुपये अवैध पैशातून अदा करण्यात आले होते. मेसर्स आर्मस्ट्राँग एनर्जी प्रा. लि. आणि मेसर्स परवेश कन्स्ट्रक्शन्स प्रा. लि. यांच्याकडून ही रक्कम मिळाली होती.
याआधी ईडीने भुजबळ कुटुंबियांची सुमारे २८० कोटी रूपयांची संपत्ती, मालमत्ता जप्त केली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भुजबळ यांचे चिरंजीव पंकज आणि पुतणे समीर संचालक असलेल्या ’देविशा कन्स्ट्रक्शन’ची नवी मुंबईतील १६० कोटींची जमीन ईडीने जप्त केली आहे. नवी मुंबईच्या खारघर भागातील या जमीनीचा हक्क भुजबळ कुटुंबीयांकडे आहे.

डिसेंबर महिन्यात भुजबळांची वांद्रे आणि सांताक्रुजमधली ११० कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीने ’फेमा’ कायद्यांतर्गात भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध एफआयआर नोंदवली होती. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत ईडीने ही कारवाई केली आहे.