ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यांना निलंबीत करा- आव्हाड

मुंबई, दि. २३ (प्रतिनीधी) - पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात देशविरोधी घोषणाबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या प्राचार्यांना निलंबीत करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. कोणतीही शहानिशा करता विद्यार्थ्यांवर आरोप करणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी ही मागणी केली.

पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील कथित देशविरोधी घोषणाबाजीवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. कोणतीही शहानिशा न करता विद्यार्थ्यांवर देशविरोधी घोषणांचा आरोप लावणाऱ्या प्राचार्याचं निलंबन करा. तसंच परवानगीविना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यक्रम कसा होऊ दिला, असाही सवाल विरोधकांचा आहे.

फर्ग्युसन महाविद्यालयात काल देशविरोधी घोषणा झाल्याचा दावा नव्हे, तर शंका होती, असं घुमजाव प्राचार्य रवींद्रकुमार परदेशी यांनी केलं आहे. महत्वाचं म्हणजे जे पत्र पोलिसांना कॉलेजनं लिहिलं होतं, त्यात ”असल्यास” हा शब्द चुकून राहिल्यानं तो कॉलेजचा दावा ठऱवला गेला असंही त्यांनी म्हटलं