ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बाळासाहेबांना मारण्यासाठी दहशतवादी पाठवला होता; हेडलीचा गौप्यस्फोट

मुंबई, दि. २४ (प्रतिनीधी) - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मारण्यासाठी लष्कर-ए- तोयबाने एक दहशदवादी पाठवला होता. परंतु तो पोलिसांच्या हाती लागला असा गौप्यस्फोट 26/11 हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडलीने केला.
 
डेव्हिड हेडलीची अमेरिकेतून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुंबई मोक्का कोर्टात उलट तपासणी सुरू आहे. दहशतवादी अबू जुदालचे वकिल हेडलीची उलटतपासणी करत आहे. आज पुन्हा एकदा हेडलीने बाळासाहेबांवर हल्ल्याचा पुन्हा उल्लेख केलाय. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर लष्कर ए तोयबाने हल्ला केल्याचा कट रचला होता. यासाठी बाळासाहेबांवर हल्ला करण्यासाठी एका दहशतवाद्याला पाठवण्यात आलं होतं पण तो पोलिसांच्या ताब्यात लागला असा गौप्यस्फोट हेडलीने केलाय. 

एवढंच नाहीतर पकडला गेलेला संशयित हल्लेखोर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो फरार झाला असा खुलासाही हेडलीने केलाय. याआधीही तपासणीत हेडलीने बाळासाहेब ठाकरे लष्कर ए तोयबाच्या हिटलिस्टरवर होते. आणि यासाठी शिवसेना भवनाची दोन वेळा रेकी केली होती असा खुलासा केला होता.