ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पनवेलजवळ वॅगनार गाडीचा अपघात; 3 ठार1 जखमी

पनवेल, दि. २६ (प्रतिनीधी) - मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील रसायनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत  झालेल्या अपघातात एकाच घरातील तीन महिला ठार व चार जण जखमी झालेत जखमींवर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात आज दुपारी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पनवेल येथील लोधीवली गावाजवळ झाला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वेगणार (एमएच ०४ एफए - ३५५६)  कार बापदेव मंदिरा जवळ आली असता टायर फुटून पलटी झाली. यात हिराबाई कदम (७०), जयश्री कदम (४०), मनीषा कदम (५०) या एकाच घरातील महिलांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झालेत यामध्ये वेदांत कदम (१३), आदिती कदम(१५), रितेश कदम (१४) व ड्रायव्हर नाव समजू शकले नाही (४०) हे जखमी झाले. त्यांना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात उपचार्थ हलवण्यात आलं आहे. मुळचे सांगली जिल्ह्यातले असलेले कदम कुटुंबीय सध्या ठण्यातील बालकुम नाका येथे वास्तव्यास असल्याचे समजत.

रसायनी पोलीस पुढील तपास करीत आहेत