ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मुंबई साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणात दहा जण दोषी, तिघे निर्दोष

मुंबई, दि. २९ (प्रतिनीधी) -  मुंबईत २००२ आणि २००३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी टाडा न्यायालयानं आज १६ आरोपींपैकी १० जणांना दोषी ठरवलं आहे. तर, अन्य तिघांची निर्दोष सुटका केली. या प्रकरणी उद्या शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

१३ पैकी १० आरोपी दोषी सिद्ध झाले असून मोहम्मद नदीम पालोबा, हारुन रशिद लोहार, अद्नान बिलाल मुल्ला या तिघांना निर्दोष सोडण्यात आलं आहे. साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी शिक्षेची सुनावणी उद्या करण्यात येणार आहे.

डिसेंबर २००२ आणि मार्च २००३ दरम्यान मुंबईच्या विविध भागांमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. ६ डिसेंबर २००२ रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनजवळ मॅक्डोनाल्डमध्ये, २७ जानेवारी २००३ रोजी पार्ल्याच्या भाजी मार्केटमध्ये तर १३ मार्च २००३ रोजी मुलुंड रेल्वे स्टेशनजवळ लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यात १२ जणांचा मृत्यू झाला होता, तर २७ जण जखमी झाले होते.

नेमके कुठे झाले होते बॉम्बस्फोट?
६ डिसेंबर २००२ : मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात स्फोट, २२ जण जखमी
२७ जानेवारी २००३ : विले पार्ले (पूर्व) बाजारात स्फोट, ३० जण जखमी
१३ मार्च २००३ : मुलुंड रेल्वे स्थानकाजवळ लोकलमध्ये स्फोट, १० जणांचा मृत्यू, ५० जण जखमी