ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

डान्सबारबाबत राज्य सरकारचा कडक कायदा

मुंबई, दि. ३० (प्रतिनीधी) - मुंबईत झमझम सुरू होण्याचा मार्ग सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मोकळा झाला असला तरी  राज्य सरकारने कायदा आणखी कडक करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार बारबालांना स्पर्श केल्यास सहा महिन्यांची शिक्षा आणि १० लाखांचा दंड ठोठवण्याची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे.

डान्स बारबाबतचा नवा कायदा जास्त कडक करण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. सध्या सुरू असलेल्या बजेट अधिवेशनात या विधेयकाचा मसुदा विधिमंडळाच्या संयुक्त संसदीय समितीला सादर करण्यात आला. त्यावर समितीचा अभिप्राय मागवण्यात आलाय. यामध्ये नव्या कायद्यात शाळा आणि धार्मिक स्थळापासून एक किलो मीटरच्या परिसरात डान्सबारना परवानगी मिळणार नाही. 

बारच्या आत आणि बाहेरही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची तरतूद करण्यात येणार आहे. बारबालांना स्पर्श करणार्‍यांना सहा महिने तर बारबालांच्या शोषणाला जबाबदार असणार्‍यांना तीन वर्षे शिक्षा आणि 10 लाखांचा दंड अशी तरतूद करण्यात आली आहे. तसंच डान्सबारमध्ये प्रवेशासाठी ग्राहकांना ओळखपत्र सक्तीचे करण्याची तरतूद करण्यात आलीये.