ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रेल्वेमध्ये अर्ध्या तिकिटावर प्रवास करणाऱ्यांना सीट मिळणार नाही

मुंबई, दि. ३० (प्रतिनीधी) - रेल्वेचा प्रवास म्हणजे सुखकर प्रवास म्हणाऱ्यांना आता हाच प्रवास त्रासदायक ठरणार आहे. कारण रेल्वेत हाफ म्हणजेच अर्ध्या तिकिटावर प्रवास करणाऱ्या मुलांना रेल्वे प्रवासात आता बर्थ अथवा सीट मिळणार नाही. रेल्वे प्रशासनाने तसा निर्णय घेतला आहे. या नियमाची अंमलबजावणी येत्या २२ एप्रिलपासून होणार आहे.

सीट हवी असल्यास पूर्ण तिकीट काढावे लागणार आहे. २२ एप्रिलपासून या नियमाची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे वर्षभरात दोन कोटी व्यक्तींना आरक्षित तिकीट मिळण्यास मदत होणार आहे. रेल्वेला सुमारे ५२५ कोटी रुपयांचा फायदा होणार आहे.

ज्या मुलांचे वय ते १२ वर्षे दरम्यान आहे अशा मुलांसाठी रेल्वेत हाफ तिकीट काढता येते. पूर्वी हाफ तिकीटधारकांना पूर्ण सीट मिळत होते. आता प्रवाशांना आपल्या मुलांना एकाच बर्थवर घेऊन झोपावे लागणार आहे. त्यांच्यासाठी रेल्वे प्रवास त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.

तिकीटदरात वाढ करता उत्पन्न वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध पर्याय शोधत आहे. हाफ तिकीटातून रक्कम वसूल होईल आणि संबंधित सीट दुसऱ्या प्रवाशाला देऊन रक्कमही घेईल. शिवाय हाफ तिकीटधारकांना सीट हवी असेल तर त्यासाठी पूर्ण तिकिटाचे पैसे देणे अनिवार्य असणार आहे. यातून रेल्वेच्या उत्पन्नात भर पडणार आहे. नियमाची अंमलबजावणी २२ एप्रिलपासून होणार आहे. ज्यांना सीट हवी आहे ते पूर्ण तिकीट काढून सीट मिळवू शकतील असे मुंबई मध्य रेल्वेचे उपमुख्य वाणिज्य व्यवस्थापक के. जयशंकर यांनी सांगीतले.