ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

बालिका वधू फेम प्रत्युषाची आत्महत्या की खून ?

मुंबई, दि. २ (प्रतिनिधी) - ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जीनं (वय २५)  काल (शुक्रवारी) आपल्या कांदिवली येथील राहत्या घरी गळफास घेऊन शुक्रवारी आत्महत्या केली मात्र, सूत्रांच्या मते, प्रत्युषाच्या शरीरावर काही संशयास्पद खुणा दिसून आल्या आहेत. प्रत्युषाचा खास मित्र आणि तिच्यासोबत काम करणारा एजाज खानने प्रत्युषाची हत्या झाली असल्याचा दावा केला आहे. 

‘प्रत्युषा फारच धीट मुलगी होती. ती कधीही आत्महत्या करु शकत नाही. तिची हत्याच करण्यात आली आहे. तसंच प्रत्युषाचा बॉयफ्रेंड राहुल राज हा या घटनेपासून फरार आहे. तसंच तो प्रत्युषाचा मोबाइलही घेऊन पळाला आहे. त्यामुळे मला वाटतं प्रत्युषाची हत्याच झाली असावी.’ असा आरोप एजाज खाननं केला आहे.

प्रत्युषाच्या काही खास मित्रांनी सांगितलं की, ‘प्रत्युषा मागील काही दिवसांपासून खूपच निराश होती. काम न मिळणं, पैशाची चणचण आणि वारंवार बॉयफ्रेंडसोबत होणारे वाद यामुळे ती फारच त्रासून गेली होती. प्रत्युषाची जवळील अभिनेत्री मैत्रीण डॉली बिंद्रानं सांगितलं की, “रुग्णालयात प्रत्युषाचे आई-बाबा नव्हते. प्रत्युषाचा बॉयफ्रेंड राहुल राजनं तिच्या काकांना याबाबत माहिती दिली. पण राहुल रुग्णालयात नव्हता. गेल्या काही दिवसांपासून राहुल आणि प्रत्युषा एकत्र राहत होते.”

तब्बल १२ तासांनी प्रत्युषाचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंहने मुंबई पोलिसांकडे जबाब नोंदवला आहे. राहुलने सांगितले की, मी घाबरलो होतो. म्हणून पोलिसांना याविषयी सांगितले नाही. आम्ही दोघे फ्लॅटमध्ये राहत होतो. आमच्याकडे दोन चाव्या होत्या. एका चावी प्रत्युषा आणि एक माझ्याकडे होती. मी बेडरुममध्ये प्रवेश केला, तेव्हा ती मला पंख्याला लटकलेली दिसली. मी खूप घाबरलो. मी लगेच शेजाऱ्यांना बोलावले. त्यांच्या मदतीने प्रत्युषाला कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये आणले. आम्हाला वाटले, की जिवंत आहे. परंतु असे नव्हते. मी घाबरलो. म्हणून मी पोलिसांना याविषयी सांगितले नाही. हॉस्पिटलमधील लोकांनी पोलिसांना बोलावले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर प्रत्युषाचे कुटुंबीयांना आणि फ्रेंड्स या घटनेची माहिती दिली.

प्रत्युषाने काल सायंकाळी चार ते पाच वाजेच्या सुमारास आत्महत्या केली. दुपारी साडेबारा वाजेनंतर ती कुणाच्याही संपर्कात नव्हती. तिच्या जवळच्या काही मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्युषाला तिच्या बॉयफ्रेंडचे दुसऱ्या एका मुलीशी अफेअर असल्याचा संशय होता. यावरून त्यांचे एक दिवस आधीच भांडणही झाले होते. तिच्या एका एक्स बॉयफ्रेंडने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्युषाने या आधीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समजतंय. एकदा तर तिने एका क्षुल्लक गोष्टीहून वाद झाल्यामुळे चालत्या कारमधून उडी मारण्याचाही प्रयत्न केला होता. 

प्रत्युषा खऱ्या अर्थाने 'बालिका वधू' या मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. यानंतर ती बिग बॉस-7 मध्येही दिसून आली होती. ती या आधी टीव्ही मालिका 'ससुराल सिमर का' मध्ये दिसून आली होती.

प्रत्युषाने नुकताच १० लोकांवर घरात घुसून असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला होता. प्रत्युषाने आरोप केला होता की, या लोकांनी घरात घुसून बॉयफ्रेंड राहुल राजसिंहची चौकशी केली होती. मात्र तो घरी नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी तिच्याशी छेडछाड केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुलने कोटक महिंद्रा बँकेकडून कार लोन घेतले होते. तो  मासिक हप्ता नियमितपणे भरत नव्हता. राहुलने ३१ डिसेंबरला दळवी यांना फोन करून, एक हप्ता घेऊन जाण्यास सांगितले होते. यानंतर जेव्हा दळवी राहुलच्या घरी गेले तेव्हा राहुलने त्यांना मारहाण केली. या घटनेनंतर रिकव्हरी एजन्ट दळवी यांनी राहुलवर कांदिवली पोलिस स्टेशनमध्ये १ जानेवारी रोजी केस फाइल केली होती. यानंतर दळवी काही सहकाऱ्यांना घेऊन प्रत्यूषाच्या घरी गेला होता. प्रत्यूषाने त्यांना सांगितले की, राहुल शहरात नाही. यानंतर दलवी तेथून निघून गेला. असाही आरोप करण्यात आला आहे की, दलवी आणि त्याचे काही सहकारी सोमवार सायंकाळी पुन्हा प्रत्युषाच्या घरी गेले होते. यावेळी त्यांनी पोलिसांसारखा ड्रेस घातला होता. राहुल घरत सापडला नाही म्हणून त्यांनी प्रत्युषासोबतच असभ्य वर्तन केले होते.