ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

डोंबिवलीत वृद्धेला उडवणारी गाडी भाजप आमदाराची?

मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी) - एका ७० वर्षीय वृद्धेला भरधाव वेगातील कारने धडक दिल्याने ती जखमी झाल्याची घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे. या अपघातानंतर पळून जाण्याच्या तयारीतील कारचालक मयुर नंदू याला पकडून स्थानिकांनी पोलिसांच्या हवाली केले आहे. विशेष म्हणजे या कारवर भाजपचा लोगो आणि पुढील बाजूस आमदार असे लिहिलेले आहे.

गाडी चालवताना कारचालक मयुर नंदू हा दारूच्या नशेत होता. तसेच त्याला पकडल्यानंतर त्याने भिवंडीचे भाजप आमदार महेश चौगुले यांचे कार्ड दाखवत आपण २ दिवसात सुटून येऊ, तुम्ही काही करू शकत नाही, अशी दर्पोक्तीही केली. त्याचवेळी भाजपचे स्थानिक नेते-कार्यकर्ते यांनीही त्याच्या अटकेनंतर पोलिस ठाण्यात धाव घेतली होती.

दरम्यान, याबाबत आमदार महेश चौगुले यांच्याशी संपर्क केला असता, ही गाडी आपली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजपचा लोगो आणि आमदार असे नाव असलेली ही गाडी नेमकी कोणाची, आणि भाजप नेते तिथे का गेले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.