ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पंखे काढा, आत्महत्या टाळा; राखी सावंतचे अजब तर्कट

मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी) - प्रत्युषासारख्या देशातील आई-बहिणींच्या आत्महत्या टाळायच्या असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घराघरातील छताला लटकणारे पंखे काढून टाकण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती अभिनेत्री-मॉडेल राखी सावंतने मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. ओशिवरा पोलीस ठाण्याच्याच हाकेच्या अंतरावर असलेल्या एका हॉटेलमध्ये ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. परिषदेला राखी आली ती खांद्यावर पंखा घेऊनच. 

या वेळी राखी म्हणाली की, आईवडिलांचे मुलींवर, भावांचे बहिणीवर प्रेम असेल तर आत्महत्येचे मूळ असलेला पंखा उखडून टाका. अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिची आत्महत्या नसून हत्या असल्याचे सबळ पुरावे माझ्याकडे आहेत, ते मी माध्यमांसमोर मांडेन, असेही ती म्हणाली. प्रत्युषाची आत्महत्या नसून तिची हत्या झाली आहे, त्याविषयीचे पुरावे माझ्याकडे आहेत, राहुल राज सिंहची मैत्रिण सलोनी हिने मला एक चित्रफित पाठवली आहे. ती आज मी दाखवणार होते, पण गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आधी कबूल करुन ऐनवेळी या पत्रकार परिषदेला येण्याचे टाळल्याने मी चित्रफीत दाखवू शकणार नाही, असे राखीने सांगितले. ‘लौटकर आओ प्रत्युषा’ असा फलक राखीच्या मागे लावण्यात आला होता. 

पत्रकार परिषदेला तिने कमालीच्या गांभीर्याने सुरुवात केली. प्रत्युषाच्या पालकांना सरकारने पाच कोटींची भरपाई द्यावी अशी मागणी तिने केली आणि सर्वाच्याच भुवया उंचावल्या. मग राखीने खास तिच्या शैलीत फटकेबाजी सुरु केली. प्रत्युषासारख्या देशातील मुली वाचवायच्या असतील, आत्महत्या टाळायच्या असतील तर, घराघरात असलेले पंखे काढून टाकण्यास सुरुवात करा, असा संदेश दिला. मग, उकाडय़ाचा सामना कसा करायचा हे विचारल्यावर, वातानुकूलित यंत्रे, टेबलपंखे यांचा वापर करा, असेही सांगायला राखीने कमी केले नाही. 

एका प्रसिध्द अभिनेत्रीने इमारतीवरुन जीव दिला होता मग गगनचुंबी इमारतीही बांधू नयेत का, असे विचारल्यावर राखी चिडली. हेच उपाय जर मनुष्यबळ मंत्र्यांनी सांगितले असते तर तुम्ही ते मान्य केले असते, पण केवळ मी सांगतेय म्हणून तुम्ही हसण्यावारी नेऊ नका असाही सल्लाही तिने पत्रकारांना दिला. तब्बल ४५ मिनिटे अव्याहत बोलत बसलेल्या राखीने मग बरीच अतार्किक विधाने केली मात्र, प्रत्युषाच्या आत्महत्येविषयी राखी काहीतरी सांगेल अशी आशा घेऊन आलेल्या सर्व पत्रकारांच्या अपेक्षा मात्र हवेतच विरुन गेल्या.