ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अरबाज खान - मलायका होणार वेगळे?

मुंबई दि. 10 - अरबाज खान आणि मुन्नी गर्ल मलायका अरोरा यांच्या घटस्फोटासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असणारी चर्चा अखेर खरी ठरण्याची शक्यता आहे. सलमान खानने गेल्या काही दिवसांत अरबाज आणि मलायकामधील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मलायकाचा घटस्फोटाचा निर्णय अंतिम असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मलायका मागील तीन महिन्यांपासून अरबाजपासून वेगळी राहत आहे. ती खारमधील भाड्याच्या घरात मुलगा अरहानसोबत राहत आहे. त्याच अपार्टमेंटमध्ये मलायकाची बहीण अमृता राहते; मात्र मलायका तिच्याकडे राहत नाही. अमृताने वाढदिवसानिमित्त दुबईत दिलेल्या पार्टीलाही मलायका गेली नव्हती. या पार्टीला अरबाज उपस्थित होता. नणंद अर्पिताच्या डोहाळे जेवणालाही मलायका गैरहजर राहिली होती.

१२ डिसेंबर १९९८ रोजी मलायका व अरबाज लग्नाच्या बंधनात अडकले होते. १८ वर्षांमध्ये त्या दोघांमध्ये खटके उडाल्याचे ऐकिवात नव्हते. अलीकडे ते दोघे पॉवर कपल या रिऍलिटी शोचे सूत्रसंचालन करत होते; मात्र जेमतेम तीन भागच ते एकत्र होते. शोसाठी येताना दोघेही वेगवेगळ्या गाडीतून येत असत. त्या वेळी या दोघांमध्ये खटके उडाल्याची चर्चा होती.