ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार- मुख्यमंत्री

मुंबई, दि. १४ (प्रतिनिधी) - अनधिकृत बांधकामासंदर्भात शासन गंभीर असून अनधिकृत बांधकाम करणाऱ्याविरुद्ध  कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

नवी मुंबई येथे बांधकाम व्यावसायिकांनी बनावट दस्तावेज तयार करुन ग्राहकांची फसवणूक केल्याबाबतचा प्रश्न सदस्य संजय केळकर, ॲड.आशिष शेलार यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, नवी मुंबई परिसरात अवैध बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. याबाबत शासन कोणालाही पाठिशी घालणार नाही. त्याचबरोबर अशा प्रकरणात महानगरपालिका किंवा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील कोणत्याही दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

तसेच नवी मुंबई येथील प्रकरणामध्ये ज्या नगरसेवकांनी बांधकाम केले, अशांचे नियमानुसार सदस्यत्व रद्द केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी सदस्य ॲड.आशिष शेलार, जितेंद्र आव्हाड यांनी चर्चेत सहभाग घेतला.