ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

दोन हजार कोटींचं एफेड्रिन ड्रग्ज जप्त

ठाणे, दि. १६ (प्रतिनिधी) - ठाणे पोलिसांनी सुमारे साडे 18 टन एफेड्रिन नावाचं ड्रग्ज पकडलं आहे. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल 2 हजार कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली ही पहिलीच कारवाई आहे.  याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून, यात एका नायजेरियन नागरिकाचाही समावेश आहे.

 

धक्कादायक म्हणजे हे ड्रग्ज बनवणारी कंपनी सोलापुरात असल्याचं उघड झालं आहे. सोलापुरातून हे ड्रग्ज अहमदाबादला पाठवण्यात येत होतं. त्यावेळी ठाण्याजवळ गुजरात रस्त्यावर हे ड्रग्ज पकडण्यात आलं.

 

याप्रकरणी कंपनीच्या मॅनेजरसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षापासून हे रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळत आहे. ही मुंबई – ठाण्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगण्यात येत आहे.