ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

हौस म्हणून नाही तर केलेल्या कामाचा सेल्फी : पंकजा मुंडे

मुंबई, दि. १८ (प्रतिनिधी) - लातूरमधील मांजरा नदीतला गाळ काढण्याचं काम सुरु असताना महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सेल्फी काढल्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे. इतकंच नाही तर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे.  हौस म्हणून नाही तर केलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी सेल्फी काढला. काही उथळ लोकांनी त्याचं राजकारण केलं, अशा शब्दात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सेल्फी वादावर स्पष्टीकरण दिलं आहे.

मात्र यानंतर शिवसेनेसह विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला. राज्यात भीषण दुष्काळ असताना पंकजा मुंडे फोटोसेशन करण्याची असंवेदनशीलता कशी दाखवतात? असा आरोप विरोधक करत आहेत. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, काही लोकांनी तर माझा मेकअप खराब झाल्याचं म्हटलं आहे. एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाचा जीव घेण्याचा हा प्रयत्न आहे.

पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण
लातूरच्या दौऱ्यात अनेक वेळा पाणी टंचाईच्या बैठका घेतल्या. चर खोदून पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले. अनेक ठिकाणी पाणी मिळण्यात अपयश आले. रविवारी लातूर दौऱ्यात साई बंधारा, मांजरा नदीवर सुरू असलेल्या कामाची पाहणी करताना ट्रेंच मध्ये पाणी बघून थोडसं समाधान वाटलं. मी आनंदाने ( जे मी कधी एरवी करत नाही ) कामाचे फोटो व रेकाँर्डिंग स्वतः केले. वाळवंटात ओअॅसिस दिसावे एवढा आनंद मला पाणी पाहून झाला. हा फोटो कुठल्या समारंभाचा किंवा महोत्सवाचा प्रसंगी काढलेला नाही. काही उथळ लोकांनी याला वेगळे वळण दिले. इतपत लिहिले की, मी माझा मेक अप खराब झाल्याचे म्हटले. अरे अरे, मी याबद्दल काय बोलू? कळत नाही. इतक खोटं, इतक मेड अप करून एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाचा जीव घेण्याचा हा प्रयत्न! त्याची शिक्षा काय? कोणाचं भलं करणार आहे, अशा खमंग वार्ता… दुष्काळग्रस्तांचं, शेतकऱ्यांचं की कोणाचं? हा फोटो 45 डिग्री उन्हात माझ्या विभागाच्या कामाचं अवलोकन करताना काढला. त्यात excitement नव्हती, समाधान होतं ! खरं सात्विक जगासमोर यावं. चमचमीत खमंग रोज सहन होत नाही, बनवणा-यांना आणि पचवणा-यांनाही!