ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

गॅस सबसिडी सोडण्यात महाराष्ट्र अव्वल !

मुंबई, दि. २३ (प्रतिनिधी) - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरज नसेल त्यांनी एलपीजी गॅसवरील सबसिडी सोडण्याचं आवाहन केल्यानंतर, देशभरातील 1 कोटी लोकांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्रातील तब्बल 16 लाख 42 हजार लोकांनी एलपीजी गॅसचं अनुदान न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. गरिबांना संवयंपाकाचा गॅस मिळावा यासाठी देशातील सधन नागरिकांनी गॅस सबसिडी घेऊ नये, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं. त्याला अनेक नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. यामध्ये मंत्र्यांपासून ते विरोधी पक्षातील नेत्यांपर्यंत अनेकांचा समावेश आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाने ‘गिव इट अप’ अभियान सुरू केलं आहे. बिग बी अमिताभ बच्चन या अभियानाचा भाग आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला देशभरातील जनतेसोबतच महाराष्ट्रातील जनतेनंही मोठा प्रतिसाद दिल्याचं दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 27 मार्च 2015 रोजी गॅस सबसिडी सोडण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहानला सुमारे 1 कोटी नागरिकांनी प्रतिसाद दिल्याचं समोर आलं आहे. दरम्यान,  मात्र सध्याच्या ज्या घटकांची कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक आहे, त्यात कोणतीही वाढ केलेली नाही.