ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

देवनार कचरा डेपो जळीतकांडातील मुख्य सुत्रधार अटकेत

मुंबई, दि. २३ (प्रतिनिधी) -  कच-यातील धातुच्या वस्तु शोधण्यासाठी देवनार कचरा डेपोला आग लावण्या प्रकार उघडकीस आला आहे. कचरा डेपोला आग लागल्यामुळे ठाणे परिसरात धुरामुळे अनेकांना श्वसनाचे आजार जडले आहेत. तसेच एका लहान मुलाचा मृत्यूही झाला. हे प्रकरण प्रसारमाध्यमांनी लावून धरल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून शुक्रवारी रात्री दोन मुख्य आरोपींना अटक केली.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रात्री अतीक आणि रफिक या दोन मुख्य सुत्रधारांना अटक केली.

या आगीच्या धुराने प्रदूषणाची उच्च पातळी गाठली होती. प्रसारमाध्यमांनी ही बातमी लावून धरल्यानंतर राज्य सरकारने अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांना या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून या चौकशीत लहान मुलांसह १३ जणांना अटक करण्यात आले होते. मात्र मुख्य आरोपी कोण हे पोलिसांकडून सांगण्यात येत नसल्याने या जळीतकांडाचा गुंता वाढला होता. 

दरम्यान रात्री शिवाजी नगर पोलिसांनी अतीक आणि रफिक या दोघांना अटक केले आहे. आग लावण्या मागे हे दोघे सुत्रधार असून ते लहान मुलांना पैशाचे अमिष दाखवून आग लावायला सांगायचे. यामुळे कचऱ्यात असलेल्या धातुच्या वस्तू शोधण्यास सोपे जात होते. मात्र या आगीमुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले. तसेच महापालिकेचे आग विझवण्यासाठी पैसे आणि पाणी वाया गेले. यांच्यावर समाजविघातक कृत्य केल्याच्यामुळे गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.