ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आता डाळीचे दर सरकार ठरवणार !

मुंबई, दि. २६ (प्रतिनिधी) - ज्या डाळीनं सर्वसामान्यांच्या तोंडचं पाणी पळवलं, त्या डाळीसंदर्भात महाराष्ट्र सरकार लवकरच महत्वाची भूमिका घेणार आहे.  राज्यातील डाळीचे दर नियंत्रणात राहावे, ग्राहकांना स्वस्त दरात डाळ मिळावी म्हणूज फडणवीस सरकार ‘डाळ दर नियंत्रण कायदा’ आणणार आहे.

महत्वाचं म्हणजे या कायद्याचा मसुद्यालाही आज कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे. आता हा मसुदा राष्ट्रपतींच्या सहीसाठी केंद्राकडे पाठवण्यात येणार असून, हा मसुदा आधी केंद्रीय गृहविभाग आणि मग राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येईल. असा कायदा करणांर महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरणार आहे.

यापुढे जेव्हा डाळीच्या किमती वाढतील तेव्हा किती किमतीत ग्राहकांना डाळ विकायची हे  राज्य सरकार ठरवणार. त्यामुळे साठेबाजांना आपोआपच आळा बसेल. जे कायद्याचं उल्लंघन करतील, त्यांना कमीत कमी 3 महिने ते एक वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

मोठी शहरे, जिल्हा ठिकाणं आणि गावपातळीवर दर वेगवेगळे असतील. भविष्यात कधीही डाळींचा भाव वाढू नये, यासाठी डाळ दरांवर सरकारचं नियंत्रण असेल. साठेबाजी, कमी उत्पादन अशा कारणांनी डाळ महागल्यास सरकार डाळींचा भाव स्वतः ठरवेल. या कायद्याच्या मसुद्याला आज कॅबिनेटनं मंजुरीही दिली. अशा पद्दतीचा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे.