ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अखेर आयपीएल महाराष्ट्रातून आऊट

मुंबई, दि. २७ (प्रतिनिधी) - राज्यामध्ये सध्या दुष्काळी परिस्थीत असल्यामुळे १ मे नंतरचे आयपीएलचे सामने महाराष्ट्राबाहेर खेळवण्यात येणार आहेत. आयपीएलचे सामने मुंबई आणि पुणे या ठिकाणी खेळवले जावेत अशी याचिका महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सर्वोच्य न्यायालयात केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळल्यामुळे आता १ मे नंतरचे सामने महाराष्ट्राबाहेर खेळवले जाणार आहेत.

महाराष्ट्रात पाण्याची टंचाई असताना खेळपट्टी तयार करण्यासाठी लाखो लीटर पाण्याची नासाडी होते, त्यामुळे आयपीएलचे सामने महाराष्ट्राबाहेर व्हावेत, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयापुढे आली होती.

उच्च न्यायालयानेही याचिकेत तथ्य असल्याचं नमूद केलं आणि 30 एप्रिलनंतरचे महाराष्ट्रातील नियोजित सामने इतर राज्यात खेळवण्याचे आदेश दिले. याच निर्णयाविरोधात एमसीएने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे संघांमध्ये 1 मे रोजी होणारा आयपीएलचा सामना हा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार पुण्यातच होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं तो सामना पुण्यात खेळवण्यासाठी बीसीसीआयला परवानगी दिली आहे. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने एमसीए याचिका फेटाळल्याने 1 मे नंतरचे सामने महाराष्ट्राबाहेरच खेळवले जाणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.