ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

तृप्ती देसाई यांना अज्ञातस्थळी हलवले

मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी) -हाजी अली दर्ग्यात महिलांना दर्शनासाठी प्रवेश द्यावा या मागणीसाठी आज भूमाता ब्रिगेड संघटनेने केलेल्या आंदोलनास मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. दर्ग्यात प्रवेश करण्यासाठी आलेल्या तृप्ती देसाई व त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अज्ञात स्थळी नेले आहे.

दर्गा परिसरात प्रचंड घोषणाबाजी सुरू असल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अज्ञातस्थळी जाण्यापूर्वी तृप्ती देसाई माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाल्या की, आपण पोलिस बंदोबस्तात दर्ग्यात प्रवेश करून दर्शन घेणार आहोत. कोणाचाही विरोध होत असला तरी आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत.
  
देसाई यांच्या आंदोलनाला विरोध करत आबू आझमी यांनी विरोध केला आहे. ‘देसाई यांनी दर्ग्यात घुसण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना धक्के मारून बाहेर काढू’ असा इशारा आझमी यांनी दिला आहे. तर आम्ही अशा धमक्यांना भीत नाही. आम्ही महिलांच्या हक्कासाठी आंदोलन करणार आहोत. 

त्यासाठी कोणी विरोध करत असेत, तर हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत, अशी प्रतिक्रिया तृप्ती देसाई यांनी दिली आहे.