ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

महावितरणमध्ये 'ऑनलाईन' वीजबील भरणा ३४८२ कोटींवर!

मागील वर्षाच्या तुलनेत 'ऑनलाईन' भरणात 1561 कोटींनी वाढ
मुंबई, दि. ३ (प्रतिनिधी) - राज्यभरातील महावितरणच्या ग्राहकांनी आर्थिकवर्ष 2015-16 मध्ये तब्बल 3482 कोटी 58 लाख रुपयांच्या वीजबिलांचा 'ऑनलाईन' भरणा केला आहे. महावितरणने संकेतस्थळावरून ऑनलाईनची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर वीजदेयकांच्या 'ऑनलाईन' भरणाकडे वीजग्राहकांचा कल मोठया प्रमाणात वाढत आहे. तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारे वीज बिल भरणार्‍यांची संख्याही लक्षणीय आहे.

वीजग्राहकांच्या आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत वीजबील भरणाची घरबसल्या सोय व्हावी यासाठी महावितरणने इंटरनेटद्वारे www.mahadiscom.in या वेबसाईटवर 'ऑनलाईन' बील पेमेंट सुविधा लघुुदाब वीजग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.  2014-15 मध्ये महावितरणच्या वीजग्राहकांनी 1920 कोटी 88 लाख रुपयांचा 'ऑनलाईन' भरणा केला होता. यातुलनेत 2015-16 मध्ये वीजग्राहकांनी तब्बल 3482 कोटी 58 लाखांचा भरणा केला आहे. वर्षभरातच 'ऑनलाईन' वीजबील भरणात तब्बल 1561 कोटी 70 लाखांनी वाढ झाली आहे.

वीजबिलाच्या 'ऑनलाईन' भरणामध्ये आघाडीवर असलेल्या पुणे, भांडूप व कल्याण परिमंडलात सन 2015-16 मध्ये तब्बल 250 ते 300 कोटी रुपयांनी वाढ झाली असून वर्षभरात पुणे-860 कोटी, भांडूप -747 कोटी तर कल्याण परिमंडलात 551 कोटी रुपयांचा भरणा झाला आहे. याशिवाय आतापर्यंत वार्षिक 90 कोटींपर्यंत ऑनलाईन भरणा होत असलेल्या नाशिक परिमंडलात 271 कोटी, नागपूर 118 कोटी, कोल्हापूर 135 कोटी, बारामती 151 कोटी आणि औरंगाबाद परिमंडलात 125 कोटी रुपयांच्या वीजबिलाचा भरणा झाला आहे.

महावितरणकडून राज्यभरातील लघुदाब वीजग्राहकांसाठी 'ऑनलाईन' बिल भरणासह इमेलद्वारे वीजबिलाची सेवा उपलब्ध करून दिली आहे. यात छापील कागदाऐवजी गो-ग्रीन अंतर्गत वीजबिलाच्या इमेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा तीन रुपये सूट दिली जात आहे. तसेच छापील कागदासह इमेलद्वारेही वीजबील मिळविण्याची सोय उपलब्ध आहे. याबाबतची माहिती www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वीजबिलाचा 'ऑनलाईन' भरणा करण्यासाठी क्रेडीट, डेबीट किंवा नेटबॅकींगचा पर्याय उपलब्ध असून वीजदेयक भरण्याची मुदत संपल्यानंतरही विलंब शुल्काच्या रकमेसह देयक 'ऑनलाईन' भरणाची सोय उपलब्ध आहे. मुदतीनंतर भरलेल्या देयकाची पावती महावितरणच्या संबंधीत कार्यालयात दाखविणे आवश्यक आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळता येईल. ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे ग्राहकांना त्याचा मोठा लाभ मिळत असून महावितरणच्या या सुविधांचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे. 

मोबाईल अ‍ॅपद्वारे 19 कोटी रूपयांचा भरणा
मागील वर्षी महावितरणने मोबाईल अ‍ॅपची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली त्याचा ग्राहकांनी मोठा लाभ घेतला आहे. राज्यभरातील 2 लाख पेक्षा अधिक युजर्सनी हे अ‍ॅप डाउनलोड केले असून त्यांनी सुमारे 19 कोटी रूपयांपेक्षा अधिक रूपयांची वीज बिले भरली आहे.