ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

किनन-रुबेन हत्याप्रकरणी चार आरोपींना जन्मठेप

मुंबई, दि. ५ (प्रतिनिधी) - मुंबईत २०११ मध्ये झालेल्या किनन सँटोस आणि रुबेन फर्नांडिस  दुहेरी खुन प्रकरणाचा निकाल आज लागला आहे. या प्रकरणातील चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

जिंतेंद्र राणा, सतीश, सुनील आणि दिपक या चार आरोपींना विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.

काय आहे प्रकरण?

अंधेरीतल्या बारबाहेर 20 ऑक्टोबर 2011 रोजी  किनन आणि रुबेनची भररस्त्यात हत्या करण्यात आली होती. मित्र-मैत्रिणींसोबत पार्टीला गेलेल्या किनन आणि रुबेन एका पानाच्या दुकानावर पान खाण्यासाठी थांबले होते. यावेळी दोषी जितेंद्र राणाने दोघांसोबत असलेल्या एका मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला, ज्याला किनन आणि रुबेनने विरोध केला. यानंतर आरोपी आणि दोघांमध्ये झटापटही झाली. याचा राग मनात धरत आरोपीने काही वेळानंतर आपल्या साथीदारांना बोलावून भर रस्त्यात किनन आणि रुबेनची हत्या केली होती.


जितेंद्र राणा, सतीश, सुनील आणि दीपक यांच्यावर खून, विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणावर विशेष न्यायालयात चार वर्ष युक्तीवाद सुरु होता. अखेर पाच वर्षांनी या दुहेरी हत्याकांड प्रकरणी किनन आणि रुबेन यांन न्याय मिळाला आहे.