ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मुंबईत ९८ हजार घरे विक्रीविना पडून

नवी दिल्ली, दि. ६ (प्रतिनिधी) - देशात रिअल इस्टेट क्षेत्राला मंदी आलेली असतानाच विविध शहरांत न विकल्या गेलेल्या घरांची संख्या प्रचंड आहे. एका अहवालानुसार मुंबईत तब्बल ९८ हजार घरे विक्रीअभावी पडून आहेत. दिल्ली एनसीआरमध्ये सर्वाधिक घरे ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांचा विपरित परिणाम वित्तीय सेवा आणि पोलादसारख्या उद्योगावर होत असल्याचे या अहवालात नमूद केले आहे.

बिल्डरनी घरांच्या किमती व व्याज दर उतरवले असले तरीही घरांची मागणीच घटली आहे. निवासी फ्लॅट्ससाठीची मागणी जवळपास २५ ते ३० टक्क्यांनी उतरली आहे. तर व्यावसायिक जागांसाठीची मागणी ३५ ते ४० टक्क्यांनी घसरली आहे.

दिल्ली-एनसीआरमधील ही आकडेवारी आहे. मुंबईत नवी मुंबई, ठाणे आणि इतर उपनगरांत मोठय़ा प्रमाणावर बांधकाम व्यवसाय जोरात आहे. तरीही मुंबई क्षेत्राचा घरे पडून राहण्याच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो. मुंबईपाठोपाठ बंगळुरू आणि चेन्नईचा क्रमांक आहे. मुंबईत २७.५ टक्के फ्लॅट्स आणि इमारती विक्रीअभावी पडून आहेत. चेन्नई २२.५ टक्के, अहमदाबाद २० टक्के, पुणे १९.५ टक्के आणि हैदराबाद १८ टक्के असे प्रमाण आहे.

एनसीआरमध्ये जवळपास २,५०,००० फ्लॅट्सना ग्राहक मिळालेला नाही. टक्केवारीत ही संख्या ३५ टक्के आहे. हे फ्लॅट्स बांधकाम सुरू असलेल्या अवस्थेत असून नियामक मंजुरी मिळण्यात विलंब आणि खटले यामुळे ही घरे विकली गेलेली नाहीत. तीन बेडरूम, दोन बीएचके आणि सिंगल रूम फ्लॅट्सच्या किमती नोएडात ३५ टक्के, गुरगावमध्ये ३० टक्के आणि दिल्लीतील २५ टक्क्यांनी उतरवल्या आहेत. तरीही घरांच्या मागणीत मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे. बंगळुरूत न विकल्या गेलेल्या घरांची संख्या ६६,००० असून चेन्नईत ती ६०,००० तर पुण्यात ५५,००० घरे पडून आहेत.

बांधकाम क्षेत्रातील मंदावलेल्या हालचालींमुळे कामगार बाजारपेठेवर नकारात्मक परिणाम होत असून या क्षेत्रात आज १ कोटी ते १ कोटी २० लाख कामगार आहेत. विक्री तसेच नव्या प्रकल्पांच्या लाँचिंगमध्ये झपाटय़ाने झालेल्या घसरणीवरून निवासी घरांची बाजारपेठ मोठय़ा प्रमाणात किमतीच्या पेचप्रसंगाला सामोरी जात असल्याचे दिसते, असे आसोचामच्या अहवालात म्हटले आहे.