ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

तू बुलेटवरून आलीस का? मुख्यमंत्र्यांचा आर्चीला प्रश्न

मुंबई, दि. ११ (प्रतिनिधी) - संपूर्ण महाराष्ट्राला 'याड' लावणाऱ्या सैराटला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. सैराटच्या कलाकारांना भेटण्याचा मोह राज्याचे मुख्यमंत्र्यांनाही आवरात आला नाही. सैराट फेम आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती आर्ची अर्थात रिंकू राजगुरु आणि परशा अर्थात आकाश ठोसर यांच्यासह सैराट टीमने काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

वर्षा बंगल्यावर या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आर्चीला पहिला पश्न विचारला तो म्हणजे, तू बुलेवटरून आलीस का? 

मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना रिंकू म्हणाली, “मी बुलेटवरुन नाही, गाडीतून आले”. “मुख्यमंत्र्यांशी कधी भेट होईल, हे वाटलंच नव्हतं, पण ‘सैराट’मुळे भेट झाली. सैराटच्या यशामुळे खूप छान वाटतंय”, असं रिंकू म्हणाली.

तर संपूर्ण टीमने घेतलेल्या मेहनतीचं फळ म्हणजे सैराटचं यश आहे, असं परशा अर्थात आकाश ठोसर म्हणाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण टीमचं भरभरुन कौतुक केलं. तसंच ‘वर्षा’ बंगल्यावरील अनेक कर्मचाऱ्यांनीही आर्ची आणि परशासोबत फोटोसेशन केलं. 

याप्रसंगी मुख्यमंत्र्यांसह गृहराज्य मंत्री राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले उपस्थित होते. तर ‘सैराट’कडून दिग्दर्शक नागराज मंजुळे, निखिल साने