ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई, दि. १३ (प्रतिनिधी) - राज्यातील पोलीस महासंचालक, अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने शुक्रवारी जारी केले आहेत. यामध्ये काही अधिकाऱ्यांना बढतीही देण्यात आली आहे. 

बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांच्या नियुक्तीचे ठिकाण पुढीलप्रमाणे 
१. प्रभात रंजन – पोलीस महासंचालक (विधी आणि तांत्रिक सहाय्य) 
२. व्ही. डी. मिश्रा – पोलीस महासंचालक, महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ 
३. बी. के. सिंग – अतिरिक्त पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग 
४. एस. के. वर्मा – अतिरिक्त पोलीस महासंचालक, मुख्य दक्षता अधिकारी, म्हाडा 
५. के. के. सारंगल – अतिरिक्त पोलीस महासंचालक, मुख्य दक्षता अधिकारी, विक्रीकर विभाग 
६. विनय कारगांवकर – अतिरिक्त पोलीस महासंचालक, मुख्य दक्षता अधिकारी, सिडको, नवी मुंबई 
७. के. एल. बिष्णोई – अतिरिक्त पोलीस महासंचालक, मुख्य व्यवस्थापक, महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ 
८. हेमंत नागराळे – पोलीस आयुक्त, नवी मुंबई 
९. अतुलचंद्र कुलकर्णी – अतिरिक्त पोलीस महासंचालक, दहशतवादविरोधी पथक, मुंबई 
१०. विवेक फणसळकर – अतिरिक्त पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई 
११. व्ही. व्ही. लक्ष्मीनारायणन – अतिरिक्त पोलीस महासंचालक, पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई 
१२. राजेंद्र सिंग – अतिरिक्त पोलीस महासंचालक, पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई 
१३. प्रज्ञा सरवदे – अतिरिक्त पोलीस महासंचालक, प्रशासन, पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई