ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

सेवानिवृत्त वीज कर्मचार्‍यांसाठी मेडिक्लेम योजना

मुंबई, दि. १३ (प्रतिनिधी) - दि ओरिएंटल इंशुरन्स कंपनी लि., मार्फत महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या तिन्ही राज्य विद्युत कंपन्यांमधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांसाठी मेडिक्लेम योजना घोषित करण्यात आली आहे.

पुणे येथील दि.ओरियंटल इन्शुरन्स कंपनी मर्यादित या विमा कंपनीच्या वतीने तिनही वीज कंपनीतून सेवानिवृत्त झालेल्या व वयवर्ष ७० पर्यंत असलेल्या कर्मचार्‍यांसाठी नवीन मेडिक्लेम पॉलिसी राबविण्यात येत आहे. या योजनेचा कालावधी दि. १ जुलै २०१६ ते ३० जून २०१७ असा एक वर्षाचा असून पहिला हप्ता कर्मचार्‍यांनी विमा कंपनीकडे भरावयाचा आहे.

या पॉलिसीकरिता कर्मचार्‍याला कुठल्याही पूर्व वैद्यकीय चाचणीची आवश्यकता नसून कर्मचार्‍याला एमडी इंडियाच्या नेटवर्क रूंग्णालयातून विनारक्कम उपचार घेता येतील. तसेच नेटवर्कच्या बाहेरील रूंग्णालयातून उपचार घेतल्यास वैद्यकीय प्रतीपूर्तीची सुविधा उपलब्ध करूंन देण्यात आली आहे. सेवनिवृत्त कर्मचार्‍याचे पती किंवा पत्नी यांनाही या सेवेचा लाभ घेता येईल.

सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना सध्या असलेल्या आजाराचा समावेश या योजनेत करण्यात आलेला आहे. तसेच योजनेत सहभाग घेतल्यापासूनच्या पहिल्या ३० दिवसांतील आजार व पहिल्या २ वर्षांसाठी वगळंण्यात येणार्‍या आजारांचादेखील समावेश या योजनेत करण्यात आला आहे.

या योजनेत माफक विमा हप्ता भरूंन सहभागी होता येईल. पॉलिसीची रक्कम १ लाख, २ लाख व ३ लाख रूंपयांपर्यंत मर्यादित असून सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार पॉलिसीची निवड करता येईल. यासाठी http://msebretired.mdindia.com:82/  या संकेत स्थळांवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी १५ मे ते १५ जून २०१६ पर्यन्त करावयाची आहे. सदर विमा पॉलिसीबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी 020-26453034/26450382 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.